अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शिबीराचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूबाबतच्या सूचनांचे पालन करून एप्रिल 2022 या महिन्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            शिबीरासाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्कचा वापर, विल्हेवाट लावण्याजोगे हातमोजे आणि सॅनिटायझर घेऊन यावे. शिबीरामध्ये एकमेकापासून सहा फुटाचे अंतर ठेवावे. पक्क्या परवान्याची चाचणी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर घेताना एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करून दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

            हे शिबीर मोडनिंबमध्ये उपविभागीय अभियंता,सीना-माढा प्रकल्प उपविभाग-4 यांचे सांस्कृतिक भवन-6 एप्रिल, माढा शासकीय विश्रामगृह- 8एप्रिल,सांगोला शासकीय विश्रामगृह-12 एप्रिल, टेंभुर्णी शासकीय विश्रामगृह-19 एप्रिल, कुर्डूवाडी शासकीय विश्रामगृह-21 एप्रिल आणि करमाळा शासकीय विश्रामगृह-26 एप्रिल 2022 रोजी होणार आहे.   

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here