अंगावर शहरा आणणाऱ्या तडाखेबंद अशा ‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ या महानाट्याने गादेगावकर थक्क

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अंगावर शहरा आणणाऱ्या तडाखेबंद अशा ‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ या महानाट्याने गादेगावकर थक्क

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून गादेगाव येथे लेखक, दिग्दर्शक, करत प्रकाशकुमार वाघमारे यांचे ‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते..

‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप! या तत्वाला अनुसरून आज छत्रपतींच्या विचारांना स्मरून ते आचरणात आणण्याची गरज आहे, हा संदेश या महानाट्यातून मिळतो..

सद्यपरिस्थितीवर चपखलपणे भाष्य करणारे हे महानाट्य आहे. या महानाट्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली..

तसेच नवनवीन कार्यक्रमांच्या आयोजनांमधून नेहमीच नागरिकांना नवे काहीतरी देणाऱ्या श्री.अभिजीत पाटील यांच्या या उपक्रमाचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे..

आज गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन करून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पुढे महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील, विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण, भाई माधवराव बागल, यांनी पवित्र भूमीत भेटी दिल्या… त्याच पवित्र भूमीत आज छत्रपती महानाट्य होत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असताना आपली अशीच साथ रहावी असे अभिजीत पाटील म्हणाले..

यावेळी गादेगाव सरपंच दिपाली बागल, उपसरपंच लता हुंडेकरी, स्वेरी संस्थापक डाॅ.बी.पी.रोंगेसर, व्हा.चेअरमन प्रेमलता रोंगे, विठ्ठलचे मा.संचालक सूर्यकांत बागल, मा.जि.सदस्य चंद्रकांत आण्णा बागल, विठ्ठलचे मा.संचालक धनंजय आबा बागल, श्रीरंगबापू बागल, विठ्ठल संचालक तानाजी काका बागल, बाजर समिती संचालक महादेव बगाल, ग्रा.सदस्य गणेश बागल, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब बागल, आकाश मांडवे, संजय कदम, मनसे अनिल बागल, शिवसेना (उबाठा) रणजीत बागल,मा.सरपंच विकास भोसले, मा.सरपंच विश्वंभर डोळस, रवि माने, महादेव फाटे,पोपट बागल यासह मोठ्या संख्येने महिला भगिंनी, जेष्ठ नागरिक, तरूण सहकारी मित्र शिवभक्त प्रेमी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here