अंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ!(असंघटित कामगारांना मोफत ‌भोजन‌ व्यवस्था)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या मोहिमेअंतर्गत देशभरात सेवा पंधरावडा घोषित केला होता या अनुषंगाने मोहोळ मोहोळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर, वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ, वृक्षारोपण तसेच असंघटित कामगारांना मोफत कायमस्वरूपी भोजन व्यवस्था योजनांचा शुभारंभ सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी व अर्थ व बांधकाम सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ भारतीय जनता पार्टीचे तालुकाउपाध्यक्ष माऊली भगरे यांनी केले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी बांधकाम व अर्थ सभापती मा.विजयराज डोंगरे,शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.दत्तात्रय सावंत सर,माजी मंत्री मा.लक्ष्मणराव ढोबळे, संजय (आण्णा) क्षीरसागर, शंकरराव वाघमारे सुशील (भैय्या) क्षीरसागर,विश्वराज (भैय्या) महाडिक, तहसीलदार प्रशांत बेंडसे पाटील, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोलीचे प्राध्यापक संजय जोशी,निलेश देशमुख,तालुकाध्यक्ष सुनिल दादा चव्हाण,सज्जन भाऊ पवार आनंद कुमार पवार, नाना पवार,युवा मोर्चाचे गणेश झाडे, बाबासाहेब जाधव,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.किरण मंजुळ, अंकोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉ विनोद अभिवंत, डॉ. नूरपल्ला, डॉ. विशाल बंडगर, श्री सवने, श्री मंडलिक, श्री शिंदे , श्री संतोष सातपुते, श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती शैला बसाटे, श्रीमती सुनिता डांगे, व सर्व आशा वर्कर , कांबळे एमपी डब्ल्यू , पुनम जाधवर, बंडगर मॅडम, काळे मॅडम, सरतापे एस के, पंकज पवार,‌ सर्व परिचारिका मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here