कोरोनाच्या धोक्यामुळे गतवर्षीप्रमाणेच आषाढी पालखी सोहळा साजरा करावा | वाखरी ग्रामपंचायतीची मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर, दि : ०४ – गेल्या वर्षभरापासून जगभरासह भारतामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने राज्याचे खूप मोठे नुकसान केले. सध्या राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन हळू-हळू पूर्वपदावर येत आहे.
    गतवर्षी पंढरपूरची आषाढी यात्रा हि अगदी थोडक्या भाविकांच्या उपस्थितीत कडक निर्बंधामध्ये  साजरी करण्यात आली होती. यंदादेखील कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे गतवर्षीप्रमाणे आषाढी यात्रेचा पालखी सोहळा प्रातिनिधिक स्वरुपात साजरा करावा अशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here