पंढरपूर – निर्घुण हत्या करून मृदेह टाकला कॅनोलमध्ये | पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा | ३ आरोपींना केली अटक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर : दारू पिऊन शिवीगाळ करतो म्हणून हॉटेल चालकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने आपल्याच हॉटेलमध्ये कूक(वस्ताद) म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीचा गळा आवळून खून केला.त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्या मृतदेहाच्या दोन्ही पाय व कमरेला दोरीच्या साहाय्याने दगड बांधून कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचा प्रकार काल उघडकीस आला आहे. पंढरपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ह्या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ११/०२/२०२१ रोजी पंढरपूर ग्रामीण पोलीस हद्दीत येणाऱ्या जैनवाडी गावच्या कॅनॉलमध्ये कुणीतरी पुरुष जातीच्या प्रेताच्या पायाला व कमरेला काळी दोरी बांधून आणून अज्ञात कारणावरून ते प्रेत कॅनॉलमध्ये टाकले होते.पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रेताचे शवविच्छेदन करून अहवाल सादर करण्यात आला होता.त्यानंतर सदर प्रेताचे वर्णन व माळशिरस पोलीस ठाणे मधील मिसिंग कॅम्पलेंट मधील व्यक्तीचे वर्णन एकच वाटल्याने खात्री करण्यात आली त्यावेळी हे प्रेत सुरेश गणपत कांबळे (वय-४५ वर्षे) रा.पिंपळे गुरव ता. हवेली जि.पुणे याचे असल्याची खात्री झाली.त्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी संशयित लोकांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेत कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींना अटक केली आहे.
यावेळी आरोपींनी गुन्हा कबूल करत यातील सांगितलेली हकीकत अशी की मयत सुरेश गणपत कांबळे हा गारवडपाटी येथील हॉटेल अहिल्या मध्ये कूक(वस्ताद) म्हणून गेल्या १० ते १५ वर्षांपासून काम करत होता.मात्र अलीकडेच त्याला दारूचे व्यसन लागल्याने तो दारू पिऊन हॉटेल मालक व त्याच्या घरच्यांना शिविगाळ करत होता याला कंटाळून त्याचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपी १.भाऊ मामा हुलगे,२.मामा भानुदास हुलगे,३.हनुमंत निवृत्ती गोरड (सर्व राहणार गोरडवाडी ता.माळशिरस जि. सोलापूर) यांनी ४/०२/२०२१ रोजी हॉटेलच्या बाकी कामगारांना कामावर येऊ असे सांगून त्या रात्री मयत वस्ताद हा वरच्या खोलीत झोपलेला असताना कशाच्यातरी साहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला व दुसऱ्या दिवशी अंधार होण्याची वाट पाहत मृतदेह दिवसभर वरच्या मजल्यावर खोलीत तसाच ठेवला यानंतर अंधार पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी तो मृतदेह आपल्या स्कॉर्पिओ गाडीतुन माळशिरस तालुक्यातील १० मोरी येथील कॅनॉल जवळ नेऊन मृतदेहाच्या कमरेला व पायाला दगड व दोरी बांधून कॅनॉलमध्ये फेकून दिला.मात्र तब्बल ३ महिन्यानंतर ह्या गुन्ह्याचा उलघडा झाल्याने पंढरपूर पोलिसांचे कौतुक होत आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर पुढील तपास पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे करत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here