मंगळवेढा – ३० हजारांची लाच घेतल्याचा आरोप असणारा पोलीस बेपत्ता | मंगळवेढा पोलीसांना लाचखोर पोलीस सापडेना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा : अवैध वाळू वाहतुकीमधील वाहन सोडण्यासाठी तीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी पोलीस नाईक संतोष चव्हाण आता पोलिसांनाही सापडत नसल्याचे समोर आले असून याबाबत मंगळवेढा पोलिसांच्या तपासाचीही चर्चा सध्या तालुक्यामध्ये सुरु आहे. 

      मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष चव्हाण यांच्याविरोधात लाचलुचपत प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबाना हप्ता देण्यासाठी आणि पकडलेल्या वाळूच्या ट्रॉलीवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजाराची लाच मागितल्याचा आरोप या पोलिसांवर आहे. बोराळे बीटच्या या पोलिसांवर गुन्हा दाखल असला तरी तो पोलिसांना सापडत नसल्याचे सांगितले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here