मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर दि. 28: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना गावांतच उपचार मिळावेत यासाठी गावागावांत लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी तसेच 65 एकरवरील कोविड केअर सेंटरला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देवून  सोयी- सुविधांची पाहणी केली.

                     मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी मौजे तावशी व 65 एकर मधील कोविड केअर सेंटर्सच्या पाहणी केली व डॉक्टर्स व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.तसेच दाखल कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच 65 एकर येथील कोविड केअर सेंटर येथे  माणसिक ताणतणाव व्यवस्थापणबाबत कार्यशाळेतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व यंत्रणा उत्तमरित्या काम करीत असून येथील व्यवस्था व पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व घेण्यात येणाऱ्या काळजी बद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर हे करत असलेल्या कामाबंद्दल त्यांनी कौतुक केले.

            यावेळी तालुकास्तरीय यंत्रेणेचा आढावा घेताना  श्री.स्वामी म्हणाले,  प्रत्येक गावांत ग्रामस्तरीय समित्या सक्रीय कराव्यात. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी  कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरित शोध घेवून तपासणी करा. कोणताही कोरोना बाधित रुग्ण घरी उपचार घेणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांनाउपचारासाठी  संस्थात्मक विलकरणात ठेवावे. जादा रुग्ण संख्या असलेल्या गावांतील जास्ती-जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्या. अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम,डॉ.जानकर आदी  उपस्थित होते.

0000000

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here