पुळूज गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.स्वाती शिवाजी शेंडगे यांनी पुळूज हे कोरोना मुक्त करुन दाखवले. 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पुळूज गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.स्वाती शिवाजी शेंडगे यांनी पुळूज हे कोरोना मुक्त करुन दाखवले.

 

सोलापूर // प्रतिनिधी 

पुळूज गावासाठी आनंदाची बातमी आणि अभिमानाची बातमी आजच्या स्थितीला पुळूज गाव हे कोरोना मुक्त झालेले आहे .गावांमध्ये कोणताही कोरोना पेशंट नाही.आम्ही नुसते बोलून दाखवत नाही ते करून दाखवलेले आहे . मागच्या चार पाच दिवसापूर्वी माननीय श्री प्रांत साहेब व तहसीलदार साहेब यांच्या साक्षीने मीपुळूज गावचा लोकनियुक्त सरपंच या नात्याने शब्द दिला होता ,की आमचं गाव येत्या चार-पाच दिवसात हे कोरोना मुक्त असणार आहे, आणि कोरोना पेशंटची संख्या ही झिरो असणार आहे. दिलेला शब्द खरा करून दाखवला. माननीय सचिन जी ढोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुशील बेलेकर साहेब व गट विकास अधिकारी रविकिरण घोडके साहेब पोलीस निरीक्षक किरण अवचर साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले साहेब यांच्या सहकार्याने पुळूज गाव आज कोरोना
मुक्त झालेले आहे. पुळूज गाव पूर्ण कोरोना मुक्त होण्यासाठी विस्ताराधिकारी नरळे साहेब ,सर्कल तिके साहेब, तलाठी गायकवाड साहेब ,ग्राम विकास अधिकारी कोळी भाऊसाहेब, सरपंच सौ.स्वाती शेंडगे पोलीस पाटील सौ.आनंदी पाटील डॉक्टर शिवानंद स्वामी ,व डॉक्टर बालाजी बचुटे, आशाताई ,अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दत्ता पांढरे, गुरुजी ,कोतवाल शिवाजी सलगर,ग्रामपंचायत कर्मचारी ,व पुळूज ग्रामस्थ यांनी जिवाचं रान करून पुळूज गाव हे आजच्या स्थितीला कोरोना मुक्त केल्याले आहे. धन्यवाद सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मला नेहमी अभिमान आहे आपल्या पुळूज गावा बद्दल .आम्ही जो शब्द अधिकाऱ्यांना देतो तो तो शब्द आज तुम्हा ग्रामस्था मुळे पूर्ण होतोय या गोष्टीचा अभिमान आहे. परत एकदा सर्वांना विनंती आहे कीआता काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आम्ही आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध आहे. आपलाच लाडका लोकनियुक्त सरपंच शिवाजी शेंडगे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here