सोलापुरात आज मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापुरात आज मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक येथून मोर्च्याला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी मराठा आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. सोलापूर शहरात तब्बल २ हजार तर ग्रामीण भागात २ हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. यावेळी शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. तसंच या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता बंदोबस्तासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड यांच्यासह सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून अतिरिक्त पोलिसांची तुकडी मागवण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा पण मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी करत आम्ही शांततेत मोर्चा काढणार असून पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here