सरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण देखील यात एक दिवस सामील होणार : गोपिचंद पडळकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण देखील यात एक दिवस सामील होणार : गोपिचंद पडळकर

 

एका बाजूला कोरोनाचे संकट असताना वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका शासनाने घेतली आहे. असे असताना आता 3 जुलै रोजी मोजक्या वारकऱ्यांसह आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियातून केल्याने वारकरी संप्रदायात संभ्रम वाढला आहे.

राज्यातले सरकार दारू दुकाने सुरु करताना बैठक घेत नाही बार सुरु करताना बैठक घेत नाही. मात्र बहुजन समाजाची शेकडो वर्षाच्या वारी परंपरेची सारख्या बैठक घेते आणि शेवटी परवानगी नाकारते अशा शब्दात राज्यातील ठाकरे सरकारला निशाणा करीत वारी व्हावी म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते. हे सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात काम मात्र औरंगजेबाचं करतात असा टोला लगावला.

वारकरी कोविडचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी तयार असतानासुद्धा  हे ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालतंय? असा सवाल करत 3 जुलै रोजी आळंदी येथून काही वारकरी पायी वरील सुरुवात करणार  आहे. आपणही एक दिवस यात सामील होणार असल्याचे सांगताना आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या माझी वारी माझी जबाबदारी यात सहभागी होणार असा संदेश सोशल मीडियातून गोपीचंद पडळकर यांनी दिला  आहे.

वारकऱ्यांचा नारा माझी वारी, माझी जबाबदारी

‘माझी वारी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून या वारकरी संघटना एकत्र आल्या आहेत.  सरकारला ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा पालखी सोहळा पायी केला जावा, असा आग्रह या संघटनांनी केला होता. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे वारकरी संघटनांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. सरकार पायी वारीविषयी गंभीर नसल्याचा आरोप करीत या नऊ वारकरी संघटनांनी एकत्र येत महाक्षेत्र आळंदी ते महाक्षेत्र पंढरपूर अशी पायदळ वारी करीत सरकारचा निषेध व्यक्त करण्याचे ठरविले आहे. 100 वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत या दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिंडीचे प्रस्थान 3 जुलैला आळंदीतील इंद्रायणी तीरावरून अगदी साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती विश्व वारकरी युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी ‘एबीपी माझा’ला दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here