सफाळे शिवसंपर्क मोहिम संपन्न दिव्यांग, फळ – भाजी विक्रेते, मच्छी विक्रेत्या महिला, रिक्षाचालक यांना दिला एक हात मदतीचा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सफाळे शिवसंपर्क मोहिम संपन्न

दिव्यांग, फळ – भाजी विक्रेते, मच्छी विक्रेत्या महिला, रिक्षाचालक यांना दिला एक हात मदतीचा

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

सफाळे:- शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मा.श्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात शिवसंपर्क मोहीम या कार्यक्रमा अंतर्गत अनेक नव्हे तर असंख्य तरूण वर्ग, महिला ,छोटे मोठे व्यवसाय करणारे होतकरू वर्ग, याना योग्य मार्गदर्शन करीत असल्याने शिवसेनेचे शिवसैनिक होण्यासाठी स्वखुशीने शिव संपर्क मेळाव्यात एकत्र येऊन शिवसैनिक होण्याचा अभिमान बाळगत आहेत.तसेच पालघर तालुक्यातील सफाळे येथे दिनांक २३ जुलै २०२१ रोजी शिवसेना बोईसर विधानसभा समन्वयक श्री अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालकांना कोरोना बचावासाठी सेफ्टी गार्डचे वितरण करण्यात आले.तसेच सफाळे बाजारात उपजीविके करीता रस्त्यालगत बसुन भाजी विक्री करणार्‍या महिला, तसेच मच्छी विक्री करणार्‍या महिला यांना ऊन-पावसा पासून संरक्षणासाठी छत्री वाटप करण्यात आले. तसेच वंदे मातरम या संस्थेच्या शेकडो दिव्यांग बंधू आणि भगिनींना न विसरता दिव्यांगाना त्यांच्या मागणी नुसार छत्री व वह्या वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना नेते श्री डॉक्टर विश्वास वळवी, शिवसेना नेते श्री कुंदन संखे, श्री संदिप कहाळे सहा. पोलीस निरीक्षक सफाळे पोलीस ठाणे, संतोष घरत सफाळे विभाग प्रमुख, अजित गावड, हरिश्चंद्र गावड, अरूण पाटील,विकास पाटील, नरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच अनेक आजी माजी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते. श्री अनुप पाटील यांनी त्याच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमीत्ताने गुरुपौर्णिमाच्या दिवशी दिव्यांग बांधवांना फुल नव्हे फुलाची पाकळी म्हणून १५,००० /- रूपये सर्वांसमोर मदत जाहीर केली, आणि दिव्यागांना दिलासा दिला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here