वीर धरणातून 21 हजार 505 क्युसेक्सने उजनीत विसर्ग ; नीराकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
  1. वीर धरणातून 21 हजार 505 क्युसेक्सने उजनीत विसर्ग ; नीराकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..!

शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातून रात्री 6 वाजता 800 क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.शनिवारी पहाटे 6 वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

वीर धरण क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्य मुसळधार पावसामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. शनिवारी पहाटे 6 वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

वीर धरणाच्या विद्युत गृहातून रात्री 12:30 धरणाच्या सांडव्यातून वाजता 4,637 क्युसेक्स वेगाने, 2 वाजता विसर्गाचा वेग वाढवून 12,408 क्युसेक्स, तर पहाटे 6 वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे निरा नदीकाठच्या नागरीकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here