विडी उद्योग वाचविण्यासाठी २३ जून रोजी कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विडी उद्योग वाचविण्यासाठी २३ जून रोजी कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने

सोलापूर // प्रतिनिधी 

विडी विक्रीवर बंदी घालण्यात यावी असा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्नेहा मारजाडी यांनी दाखल केल्याने विडी उद्योगावरच गंडातर आलेला आहे . म्हणून विडी उद्योग वाचवा , विडी कामगार जगवा यासाठी शिवसेना प्रणित माहराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने २३ जून २०२१ बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने करण्यात येणार आहे . अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .
सोलापूरात विडी उद्योगात ६० ते ७० हजार कामगार असून संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ५ लाख कामगार विडी उद्योगात काम करतात . असे असतांना विडी ओढल्याने कोरोना आजार येण्यास मदत होतो . म्हणून महाराष्ट्रात विडी विक्रीस बंदी घालावी . अशा मागणीचे याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्नेह मारजाडी यांनी दाखल केले आहे . आणि याबाबत सरकारला बाजू मांडण्यासाठी मा . मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केले . त्यानुसार १८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या संवादात महाराष्ट्र शासनाने आपली बाजू योग्य प्रकारे मांडले नाही . म्हणजेच विडी उद्योग बंद पडल्यास होणाऱ्या महा भयंकर परिणामाचे माहिती देण्यात असमर्थ ठरली आहे . त्यामुळे मा . मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत संशोधकांकडे तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी आदेश दिले आहे , आणि सदर बाबतचे पुढील सुनावणी शुक्रवार २५ जून रोजी होणार आहे . म्हणून महाराष्ट्र शासनाला विडी उद्योग बंद पडल्यास होणारे परिणामाचा जाणीव व्हावी म्हणून शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने २३ जून २०२१ बुधवार रोजी सकाळी ११.३० वाजता महिला विडी कामगारांचे भव्य निदर्शने करण्यात येणार आहे .
तरी विडी उद्योगावर संकट दूर करण्यासाठी व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाला जाब विचारण्यासाठी सदर निदर्शने आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी केले आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here