विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर वर्ग

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर वर्ग

सोलापूर // प्रतिनिधी

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 येथे ऊस गाळप हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या ऊस बिलाचा प्र.मे.टन रू.200/- प्रमाणे दूसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले गळीत हंगाम सन 2020-21 मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथे 15 लाख 01 हजार 844 मे.टन ऊसाचे गाळप करून 11.20 (बी.हेव्हीसह) टक्के साखर उता-याने 14 लाख 71 हजार 850 क्विंटल साखर उत्पादीत केलेली आहे. तसेच युनिट नं.2 करकंब येथे 3 लाख 83 हजार 538 मे.टन ऊसाचे गाळप करून 10.83 टक्के साखर उता-याने 4 लाख 15 हजार 390 क्विंटल साखर उत्पादीत केलेली आहे. ऊस गाळप हंगाम 2020-21 साठी युनिट नं. 1 व 2 कडील एकूण निव्वळ देय एफ.आर.पी. प्र.मे.टन रू.2376.98 इतकी आहे. एकूण देय एफ.आर.पी. ऊस बीलापैकी कारखान्याने पहिल्या हप्त्यापोटी प्र.मे.टन रू.2000/- ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा केलेले आहेत. उर्वरीत देय ऊस बीलापैकी प्र.मे.टन रू.200/- प्रमाणे दूसरा हप्ता सर्व संबंधित ऊस पुरवठादार सभासद/ बिगर सभासद शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे.त्यापोटी कारखान्याने 37 कोटी 70 लाख रूपये बँकेत वर्ग केलेली आहे. त्यासाठी उर्वरीत तिसरा हप्त्यापोटी देय रू.176.98 प्रमाणे ऊस बीलाची रक्कम धोरणाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा करणार आहोत. तसेच कारखान्याने ऊस गळीत हंगाम 2020-21 चे संपूर्ण कमिशन डिपाँझीट रक्कम ऊस वाहतुकदारांना यापूर्वीच अदा करण्यात आलेली आहे अशी माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

जागतिक पातळीवर साखरेचे दर घसरल्यामुळे सध्या साखर निर्यात करणेस अडचणी येत आहेत. तसेच देशांतर्गत साखरेस उठाव नाही. त्यामुळे दरमहा कारखान्यांना येणारा साखर विक्री कोटाही विक्री होत नाही. तसेच विक्री केलेल्या साखरेची देखील उचल होत नाही. सदरच्या शिल्लक साखरेमुळे व्याजाचा भुर्देंड वाढत आहे. तरी यामध्ये केंद्र व राज्यशासन यांनी त्वरीत साखर उद्योगाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा साखर कारखानदारी कोलमडून जाईल. सद्य परिस्थितीत साखर उद्योग अनेक अडचणींना तोंड देत मार्गक्रमण करीत आहे.आपले कारखान्याने संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द कारभार करून यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. आजपर्यंत सर्व ऊस पुरवठादारांनी कारखान्यास ऊस पुरवठा करून विश्वास दाखविला आहे त्याचप्रमाणे येणा-या गळीत हंगामामध्येही संबंधित ऊस पुरवठादारांनी पिकविलेला ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, सर्व संचालक मंडळ, प्र.कार्यकारी संचालक एस.आर.यादव व इतर अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here