मा युवक नेते रोहन परिचारक यांचे हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मा युवक नेते रोहन परिचारक यांचे हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण संपन्न.

 

सोलापूर // प्रतिनिधी

श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस श्रीपुर–महाळुंग परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.

यामध्ये श्रीपुर –अकलुज– श्रीपुर सायकल राईड, बॅडमिंटन स्पर्धा, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, महाळुंग यमाई माता येथील माकडांना अन्नदान, कोवीड सेंटर येथे अन्नदान आशा समाजोपयगी उपक्रमाचा समावेश आहे. यामधील साईकल राईड प्रमाणपत्र व बॅडमिंटन स्पर्धा पारितोषीक वितरण मा.श्री. रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते श्रीपुर येथे पार पडले. यावेळी बारामती सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीनिवास वाईकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात श्रध्येय कै.सुधाकरपंत परिचारक मालक व श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पांडुरंग सायकल क्लबची स्थापना दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.
सत्कारमुर्ती डॉ. यशवंत कुलकर्णी साहेब यांनी वाढदिवसानिमीत्त आयोजित केलेल्या सामाजिक कार्यक्रमाची प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. रोहन परिचारक यांनी सर्व सहभागी राईडर्सचे अभिनंदन केले व हे लहानसे लावलेले रोपटे आहे. याचा वटवृक्षात रुपांतर होवो व राष्ट्रीय पातळी पर्यंत नावलौकिक मिळवावा अशी सदिच्छा व्यक्त केली . अँड. श्रीनिवास वाईकर यांनी बारामती सायकल क्लब कसा नावारुपाला आला याबद्दल माहीती दिली व मार्गदर्शन केले.
मा. रोहन परिचारक, अँड. वाईकर यांच्या हस्ते सायकल राईडमध्ये सहभागी झालेल्या राईडर्सना प्रमाणपत्र व भेटवस्तु देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच सुपंत बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी संघाचा ट्रॉफी व बक्षीस देवुन सत्कार करण्यात आला यामध्ये प्रथम क्रमांक – चि. अजिंक्य शिंदे व चि. अथर्व लाटे, द्वितीय क्रमांक – डॉ. विजय डहाळे व श्री. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, तृतीय क्रमांक – डॉ. दादासाहेब पराडे व श्री. गणेश कुलकर्णी. तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याने विशेष सत्कार चि. अजिंक्य शिंदे यांचा करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे सर्व अधिकारी, परिसरातील डॉ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दत्ता नाईकनवरे यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. विजय डहाळे यांनी केले. नव्याने स्थापन झालेल्या पांडुरंग सायकल क्लबच्या पदाधिका-यांची अध्यक्ष पदी – श्री. भुषण धाईंजे, उपाध्यक्ष पदी – श्री. राजु पवार, सचिव पदी – श्री.राहुल शिवाजी साठे यांची निवड करण्यात आली. यावेळी खेळाडु, सायकल राईडर्स, कामगार व परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्तीची उपस्थिती होती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here