भाजपाच्या मोहोळ शहराध्यक्षपदी मा.सुशील (भैय्या) क्षीरसागर यांची पुनश्च एकदा फेरनिवड..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या हस्ते नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर यांची पुनश्च भारतीय जनता पार्टी,च्या मोहोळ शहराध्यक्ष पदी निवड झाली.याप्रसंगी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या

यावेळी बोलताना नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर म्हणाले की, पुन्हा एकदा माझ्यावर पक्षनेश्रेष्ठींनी दाखवलेल्या या विश्वास व जबाबदारी सोपविल्याबद्दल मी सदैव पक्षाचा आभारी आहे. हा विश्वास सार्थ करण्याचा व दिलेली जबाबदारी निर्धाराने पार पाडण्याचा नेहमीच माझा प्रयत्न राहील व मनापासून मी माननीय प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांचे आभार मानतो.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख , संघटक सरचिटणीस धैर्यशील (भैय्या) मोहिते पाटील, तालुकाध्यक्ष सुनील (दादा) चव्हाण , युवा नेते सागर दादा लेंगरे सोबत अनेक जिल्हा, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here