बेकायदेशीर बांधलेल्या कमला शांती पॅलेसवर कारवाई करण्यास म.न.पा अधिकाऱ्यांची टाळाटाळ :- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बेकायदेशीर बांधलेल्या कमला शांती पॅलेसवर कारवाई करण्यास म.न.पा अधिकाऱ्यांची टाळाटाळ :- विष्णु कारमपुरी (महाराज)

 

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर महानगरपालिका हद्दीतील जुळे सोलापूर भागात बेकायदेशीर पणे बांधण्यात आलेल्या कमला शांती पॅलेस पुर्णपणे अतिक्रमीत व बेकायदेशीर असून सदर कमला शांती पॅलेसवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत . म्हणून याबाबत महानगर पालिकेचे आयुक्त श्री . पी . शिवशंकर यांना सदर बेकायदेशीर बांधकामवर कारवाई करुन संबंधीत अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी . अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार नेते विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले आहे .
मा. म.न.पा. आयुक्त श्री. पी. शिवशंकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुर म.न.पा. शहर हद्दीतील जुळे सोलापूर भागात श्री. जयकुमार शांतीप्रसाद गुप्ता यांनी म्हाडाकडून प्राप्त केलेल्या भुखंड क्रमांक १ जुना सव्र्हे क्रमांक ३१६ नविन सर्व्ह क्रमांक १२८ सदरचे भुखंड रहिवासी वापर करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र असताना व FSI ग्रहीत धरून तसा परवानगी दिलेला असताना श्री . जयकुमार गुप्ता यांनी पुर्णपणे बेकायदेशीर बांधकाम करून व्यवसायासाठी ( कमर्शीयल ) वापर करण्याच्या दृष्टिकोनातून बांधकाम केलेले आहे . म्हणून श्री . अबरार जाकीर नाईकवाडी यांनी दि . २०/०२/२०२० रोजी आपल्याकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे . त्यावरून आपल्या सो.म.पा. च्या नगर विकासचे बांधकाम खात्यातील अधिकारी , सहाय्यक संचालक श्री . लक्ष्मण चलवादी व उपअभियंता नगररचना विभाग एन.एन. बाबर यांनी केवळ कागदोपत्री कारवाई करण्यात येत असल्याचे बनाव करीत आहेत . प्रत्यक्षात मात्र कारवाई केलेले दिसुन येत नाही . आणि तक्रारदार अबरार नाईकवाडी यांना चुकीची माहिती देऊन गेल्या दीड वर्षापासुन महानगरपालिकेला हेलपाटे घालण्यास लावत आहेत .
श्री . जयकुमार गुप्ता यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामद्वारे व्यवसाय करून लाखो रुपये महानगरपालिकेचे नुकसान करीत आहे . यास संपुर्ण जबाबदार हे सो.म.पा. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक नगररचना श्री . लक्ष्मण चलवादी व उपअभियंता नगर रचना विभाग सो.म.पा. आणि सहाय्यक अभियंता श्री . एन.एन. बाबर बांधकाम परवाना विभाग सो.म.पा. यांच्या संघनमतानेच या कारवाईत टाळाटाळ होत असल्याचा दिसुन येते . तसेच श्री . गुप्ता हे बेकायदेशीर बांधकाम करून सोलापूर महानगरपालिकेस आर्थिक नुकसान करीत आहेत . त्याचबरोबर बांधकामाचे नियम पुर्णपणे भंग केल्याने सदर कमला शांती पॅलसच्या नावाने असलेला मंगलकार्यालय पुर्णपणे पाडून टाकावे . तसेच या बेकायदेशीर बांधकामास हितसंबंध असलेले श्री . लक्ष्मण चलवारदी सहाय्यक संचालक नगर रचना सो.म.पा. व श्री . एन.एन. बाबर उपअभियंता नगर रचना सो.म.पा. यांना बडतर्फे करावे . अशी मागणी करत आहोत .
तरी माननीयांनी वरील गंभीर बाबींचा सखोल चौकशी करून वरील संबंधीतावर सात दिवसाच्या आत कठोर कायदेशीर कारवाई करावी . ही नम्र विनंती . अन्यथा शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल . याची नोंद घ्यावी . ही नम्र कळकळीची विनंती . असे नमुद करण्यात आले .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली म.न.पा. आयुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात सैफी शेख, अबरार नाईकवाडी, गफुर सौदागर, शिवा ढोकळे, श्रीनिवास बोगा, गणेश म्हंता, रेखा आडकी, प्रशांत जक्का यांचा सहभाग होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here