पदोन्नतीमधील मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसुचित जाती कल्याण समिती मा. मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार तसेच उर्वरीत प्रश्नांबाबत मा. सामाजिक न्याय मंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करणार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पदोन्नतीमधील मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसुचित जाती कल्याण समिती मा. मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार तसेच उर्वरीत प्रश्नांबाबत मा. सामाजिक न्याय मंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करणार

आ. प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

आज दिनांक 06 जुलै 2021 रोजी महाराष्ट्रातील विधानभवनातील विसावा मजला, कक्ष क्र. 2001, येथे महाराष्ट्र शासनाची अनुसुचित जाती कल्याण समितीची बैठक समिती प्रमुख तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांसमवेत संपन्न झाली.

या बैठकीमध्ये माहे फेब्रुवारी 2021 ते दि. 07 मे 2021 अखेर मागासवर्गीय पदोन्नती संदर्भात वेगवेगळे शासन निर्णय झालेले आहेत. शासन निर्णय क्र. बीसीसी-2018/प्र.क्र.366/16ब, दि.18/02/2021 च्या निर्णयानुसार 100 टक्के पदे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता भरण्याबाबत काढलेले आहे. शासन निर्णय क्र.बीसीसी-2018/प्र.क्र.366/16ब, दि. 20/04/2021 नुसार 33 टक्के राखीवप्रमाणे पदे रिक्त ठेवून इतर पदे भरण्याबाबत व शासन निर्णय क्र. बीसीसी-2018/प्र.क्र.366/16ब, दि.18/02/2021 च्या निर्णयानुसार करण्यात आलेली कार्यवाही रद्द करण्यात आली. त्यानंतर शासन निर्णय क्र. बीसीसी-2018/प्र.क्र.366/16ब, दि. 07/05/2021 हे शासन निर्णय काढून शासन निर्णय क्र.बीसीसी-2018/प्र.क्र.366/16ब, दि. 20/04/2021 रद्द करण्यात येवून दि. 18 फेब्रुवारी 2021 प्रमाणेच (म्हणजेच 100 टक्के पदे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता) पदोन्नती देण्याचा निर्णय झालेला आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व अनुसुचित जाती कल्याण समिती तात्काळ मा. मुख्यमंत्री, श्री. उध्दव ठाकरे साहेब यांची भेट घेवून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे निवेदन देणार आहे. तसेच उर्वरीत प्रश्नांबाबत मा. सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

यावेळी श्री. यशवंत माने, श्री. किरण लहामटे, श्री.लहु कानडे, श्री. अरुण लाड, श्री. विजय गिरकर, श्री. राजू आवळे, अवर सचिव खोंदले आदि. उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here