पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते अमोलराजे इंगळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते अमोलराजे इंगळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्‍या उपस्थितीत देण्‍यात आला पुरस्का

हर्षवर्धन जी पाटील यांच्या प्रमूख उपस्थित प्रशासकीय सेवा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित.

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना या महामारी मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कृषी ,प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांना कोरोना योद्धा सेवा या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू व विश्व हिंदू महासंघाचे प्रल्हाद दामोदरदास मोदी यांच्या हस्ते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत अमोलराजे इंगळे यांना कोरोना योद्धा सेवा पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.

कोरोना योद्ध्यांनी आपल्या अनमोल अशा कार्यातून वेळोवेळी सेवा दिली. अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके व सागा फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष सागर धापटे यांच्या वतीने प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना काळात वेगवेगळ्या माध्यमातून गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, डॉ. संदेश शहा पत्रकार , गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब खरात , संभाजी कैलास रेडके कृषी क्षेत्र, हनुमंत जाधव,कुमार शिंदे उद्योजक, नामदेव करे सरपंच – कळाशी, विजयकुमार फलफले, गणेश घाडगे, डॉ.संजय शिंदे पशुधन विकासअधिकारी,प्राजक्ता फडतरे शिक्षीका,रूपाली झगडे शिक्षिका यांना कोरोना योद्धा सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यामध्ये अमोलराजे इंगळे यांनी कोरोना काळामध्ये लॉकडाउन काळामध्ये सर्व काही ठप्प असताना पुणे सोलापूर हायवे वरती पोलिस बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांना नाष्टा, चहा, पाणी व मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश याचे वाटप करून प्रोत्साहित केले. तसेच याकाळामध्ये गावामध्ये डॉक्टरांबरोबर स्वतः नागरिकांची तपासणी करून त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याच काळात पोलीस बांधवांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी ठेवण्यासाठी महिला भगिनींच्या सहकार्याने रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेतले .तसेच पुणे सोलापूर सीमेलगत अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस जवानांना खाऊ व फळे वाटप करून हार,फेटा, नारळ देऊन सन्मानित करून प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी कोरोना काळात स्वतःच्या वाढदिवसाला बॅनर बाजी न करता ऊसतोड मजूर व त्यांच्या मुलांना फळे, मिठाई व कपडे देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला .याच काळात त्यांनी गरजूंना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप ,साड्या वाटप इत्यादी कार्यक्रम करून सहकार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन अमोलराजे इंगळे यांना प्रशासकीय सेवा या कोरोना योध्या सेवा पुरस्कारने सन्मानित केले.

यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे,शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद,गटनेता कैलास कदम, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,महेंद्र रेडके,माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे,गोरख शिंदे,राजकुमार जठार,हर्षवर्धन कांबळे आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सागा फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष सागर धापटे यांनी केले .तर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके हे होते या कार्यक्रमाप्रसंगी सचिन धापटे यांनी आभार मानले
तसेच अमोलराजे इंगळे मित्र परिवाराच्या वतीने मोदी साहेबांचे इंदापूरमध्ये स्वागत करून मोदी साहेबांचे मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here