पंढरपूर येथे दिंडी चालकांना जाण्यासाठी परवानगी द्यावी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर येथे दिंडी चालकांना जाण्यासाठी परवानगी द्यावी

 

विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी फक्त पन्नास वारकऱ्यांना जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून यामध्ये सहभागी करण्यात यावे यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान प्रशासक ह भ प भाऊसाहेब गंभीरे यांचे वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले

वारकरी संप्रदायाचा आत्मा श्री विठ्ठलाच्या दर्शनाची महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना दरवर्षी लागत असते परंतु ह्या करुणा महामारी मुळे मागील वर्षी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच गावा गावातील नाम सप्ताह भजन कीर्तन हरिपाठ भगवत कथा व पंढरपूर येथे खेड्यापाड्यातून ते शहरापर्यंत जाणाऱ्या दिंड्या सर्व काही बंद आहे. मागील वर्षी ही भगवत भक्तांना ारकर्‍यांना विठुरायाचे दर्शन घेता आले नाही व या वर्षीही सरकारने फक्त पन्नास वारकऱ्यांना पालखीसोबत पंढरपूरला जाता येणार आहे असाआदेश काढून त्याच्याकडे वारकऱ्यांना नाराज केले आहे यामुळे वारकऱ्यांमध्ये व सरकारमध्ये बेताचे दरी निर्माण झाली असून पंढरीला जाण्याची आशा सोडली आहे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीत 38 दिंड्या अनेक वर्षापासून पायी चालत जातात परंपरेच्या 38 दिंड्यांचा किमान एक तरी प्रतिनिधी 50 जणांच्या यादीत समाविष्ट करावा अशी मागणी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान चे प्रशासक ह भ प भाऊसाहेब गंभीरे ह भ प बाळासाहेब काकड ह भ प सागर दिंडे अमर ठोंबरे चेतन नागरे संपतराव धोंडगे राम खुर्दळ लक्ष्मीचंद्र शेंडे प्रथमेश काकड आदी भक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे याच निवेदनाची एक प्रत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना ही देण्यात आले असून विनंती करण्यात आले आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here