न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे इ. १० वी व इ. १२ वी नंतरच्या ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ कोर्स च्या प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त सुरुवात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे इ. १० वी व इ. १२ वी नंतरच्या ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ कोर्स च्या प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त सुरुवात

सोलापूर // प्रतिनिधी

कोर्टी ता. पंढरपूर येथे न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांचेकडून फॅसिलेटेशन सेंटर (एफ. सी.) क्रमांक ६७२५ ला मान्यता मिळाली असून बुधवार (दि. ३० जून २०२१ ) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणे व अर्ज निश्चित करून यादी प्रक्रिया सुरु झाली असून शुक्रवार (दि. २३ जुलै २०२१) पर्यंत चालणार आहे. सदर डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया इ. १० वी च्या निकालापूर्वीच सुरु झाली असून यासाठी विद्यार्थ्यांना फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक संबंधित शाळेकडून घेऊन डिप्लोमासाठी प्रवेश अर्ज भरता येणार आहे. तसेच या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे, अशी माहिती प्राचार्य श्री. विक्रम लोंढे यांनी दिली.

‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ सन २०२१-२२ करिता प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्वीकारून प्रमाणपत्रे, कागदपत्राची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी अधिकृत केंद्र (एफ. सी. क्र. ६७२५) म्हणून न्यु सातारा पॉलिटेक्निक ला मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व इतर ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम आणि थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांच्या मनामधील संभ्रम, संबंधित कागदपत्रे मिळताना येणाऱ्या अडचणी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले आहे. यावर्षी न्यु सातारा पॉलिटेक्निकचे हे १२ वे वर्ष असून या कॉलेजने उज्वल निकालाची व सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची परंपरा कायम राखली आहे.

दि. ३० जून ते २३ जुलै २०२१ (सायं. ५ वा.) पर्यंत विद्यार्थ्याच्या अर्ज नोंदणी व छाननी प्रक्रियेनंतर कॅपराउंड साठी ऑपशन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे, तरी या प्रवेश प्रक्रियेचा लाभ १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्था प्रतिनिधी मा. श्री. ज्ञानेश्वर शेडगे यांनी केले आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. विशाल बाड – ९९७००२००८४, प्रा. बाळासाहेब ननवरे – ७७२००३१८१५ यांच्याशी संपर्क साधावा.

कॉलेजचे चेअरमन मा. श्री. राजाराम(नाना) निकम सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, रजिस्ट्रार श्री. सतिश दिंडूरे यांच्या नेतृत्वाखाली उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने उत्कृष्ट निकाल, शिस्त आणि करिअर च्या दृष्टीने सर्वोत्तम शिक्षण देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनामध्ये न्यु सातारा पॉलिटेक्निक ची चांगली ओळख निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींवरून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पॉलिटेक्निक प्रवेशासाठी फॅसिलेटेशन सेंटर (एफ. सी.)मध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here