नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू

 

मागील आठवड्यात कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस येणार असल्यामुळे हायअलर्ट जारी करण्यात आला होता. हाय अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती; पण गुरुवारी सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. यामुळे शुक्रवारी सकाळी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची गैरसोय झाली. संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे ठाणे-बेलापूर, सायन-पनवेल या मार्गावर असणाऱ्या सखल भागात पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत होता. तर रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूने पादचाऱ्यावर रस्त्यावरील पाण्याचा वर्षाव होत होता.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून शुक्रवारी

सकाळी ८.३० वाजेपर्यंत बेलापूरमध्ये १४८. ८० मिमी, नेरुळमध्ये १४४ मिमी, वाशीमध्ये १६४.२० मिमी, कोपरखैरणेमध्ये १३५.५० मिमी, ऐरोली २०५.१० मिमीमध्ये पावसांची नोंद झाली असून पालिका क्षेत्रात सरासरी १४५.३९१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. मागील सहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर वातावरणात उकाडा जाणवत होता; पण गुरुवारपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी कामासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांना पावसाचा फटका बसला. रबाले टी जंक्शन व महापे सर्कल परिसरात पाणी साचले होते. यामुळे या भागामध्ये वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी पालिका क्षेत्रातील तीन ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here