दहावीचा निकाल जाहीर;  99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दहावीचा निकाल जाहीर;  99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा  होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.  
यंदाची निकालाची टक्केवारी  99.95  टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्हाचा लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे  हा निकाल तयार करण्यात आला आहे.  १० वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता पाहता येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा. SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा. आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका. लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here