ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे करावे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे करावे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन

 

संपूर्ण जिल्ह्याभरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी वर्ग पूर्णतः हवालदिल झालेला आहे त्या पाहणी दौऱ्याच्या अनुषणगाने कृषीमंत्री ना. दादाजी भुसे हे अमरावती जिल्हादौऱ्यावर आले असता दर्यापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पंचनामे करण्यात येत आहेत ती फक्त नदी व नाल्या लगतच्या शेतीची करण्यात येत आहेत तरी असा दुजाभाव न करता सरसकट संपूर्ण नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात यावे व तात्काळ मदत जाहीर करावी याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस किरण अरबट , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दर्यापूर विधानसभा अध्यक्ष नितिन गावंडे, दर्यापूर शहराध्यक्ष कपिल पोटे, युवक सचिव हर्षद साखरे, शहर सरचिटणीस हर्षल खाडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रथमेश ठाकरे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष अनुज हुतके , सौरभ जळमकर, श्याम धनधर, आदित्य हुतके, राम धनधर, विश्ववजीत रहाटे, अनिकेत कोल्हे मोहित गायगोले, इत्यादी पदाधिकारी व कार्याकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here