चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोख्या उपक्रम राबवण्यात आला!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोख्या उपक्रम राबवण्यात आला

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा आज वाढदिवसानिमित्ताने जिजाऊ फौंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

सन्मानीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने अविरतपणे चालू असलेली जिजाऊ थाळी मार्फत पाचशे लोकांना श्रीखंड पुरीचे जेवण वाटप करण्यात आले तसेच 51 महिलांना दोन महिने पुरेल इतका राशन देण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन तोडकर, जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा धनश्री सचिन तोडकर, उमेश साळुंखे, भास्कर पाटील, अभिजीत सूर्यवंशी, सागर गिरी, जे हेरंब तळेकर, पिंटू बामणे, जयश्री वायचळ, संपा सानप, सरस्वती थोरवत व विविध मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here