कोविड लस शिल्लकच नाही. मग विडी कामगारांनी लस कोठून घ्यावे. प्रशासनाला विष्णु कारमपुरी (महाराज) यांचा सवाल.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोविड लस शिल्लकच नाही. मग विडी कामगारांनी लस कोठून घ्यावे. प्रशासनाला विष्णु कारमपुरी (महाराज) यांचा सवाल.

सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना प्रादुर्भावामुळे लागु करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये विडी कारखानांच्याही समावेश करण्यात आला . त्यामुळे सुमारे २ महिने विडी कारखाने बंद होते . विडी कारखाने बंद असल्याकारणाने विडी उद्योगात काम करणारे सुमारे ६० ते ७० हजार कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली . म्हणून महाराष्ट्र कामगार सेना व इतर कामगार संघटनेनी विडी कारखाने चालु करण्यासाठी आंदोलने केली . त्यामुळे विडी कारखाने चालु ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला . परंतु सर्व विडी कामगारांना कोविड लस घेण्याचे बंधनकारक केले . म्हणून विडी कारखानदारांनी लस घेतलेल्या विडी कामगारांनाच काम देण्यात येईल असे जाहिर केले . त्यामुळे महिला विडी कामगार विडी कारखाने चालु झाल्यापासुन कोविड लस घेण्यासाठी कोविड़ आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत . काही वेळा महिलांना नंबरचे ठोकण देऊन परत पाठविण्यात येते तर काही वेळा ऑनलाईन नोंद करा असे म्हणून हकलून दिले जाते . रोजी रोटीचा प्रश्न असल्यामुळे महिला शहरातील विविध कोविड आरोग्य केंद्रावर हेलपाटे मारताना दिसुन येत आहेत . तर काही महिला अक्षरशः आरोग्य केंद्रावर व लोक प्रतिनिधी समोर आपली व्यथा सांगताना दिसुन येत आहे . पण कोणी काय करणार कोविड लसच प्रशासनाकडे शिल्लक नाही . त्यामुळे मा . जिल्हाधिकारी व म.न.पा. आयुक्तांनी कोविड लस शिल्लक नसतांना विडी कामगारांसाठी लस बंधनकारक असा आदेशच कस काढला ? म्हणून विडी कामगारांचा होणारा कुंचबणा व त्रास थांबविण्यासाठी ताबडतोब लसची व्यवस्था करावी . किंवा नियमात शिथिलता आणावी अशी सर्वत्र बोलले जात आहे . याबाबत लवकरच निर्णय न घेतल्यास शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना व विडी कामगारांसह तीन आंदोलन करण्यात येईल . असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here