केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर यांनी दिले कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

महाड:- केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोकण दौरा केला.महाड मधील तळिये गावात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली.त्यामुळे नुकसान झालेल्या दुर्घटनाग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी या तीन भाजपच्या नेत्यांनी संयुक्तपणे कोकण दौरा केला. यावेळी कोकण चे सुपुत्र आणि सूक्ष्म लघु उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून या दुर्घटनाग्रस्तांचे पुनवर्सन करण्यात येईल अशी घोषणा केली.तसेच
कोकणातील हाहाकार उडालेल्या चिपळुणमध्ये जाऊन त्यांनी पूर परीस्थितीचा आढावा घेतला,आणि केंद्र सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच कोणतंही राजकारण करण्याची ही वेळ नाही असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी ही पूरग्रस्त कोकणवासीयांना केंद्र सरकार तर्फे संपूर्णतः मदत केली जाईल असे आश्वासन दिले.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे मदत दिली जाईल असे आश्वासन देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here