कांद्रेभुरे – बेलपाडा ता.जि.पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

सफाळे :- सुनंदा चॅरिटेबल अॅन्ड एज्युकेशन ट्रस्ट पुरस्कृत, अनुसया राजाराम सांगवेकर वाचनालय, कै. अनंत दाजी वझे वाचनालय यांच्या संयुक्तरित्या विद्यमाने दिनांक १६ जुलै २०२१ रोजी ग्रामपंचायत कांद्रेभुरे ता,जि पालघर येथील बेलपाडा व कांद्रेभुरे येथे प्रभारी पोलीस अधिकारी श्री भीमसेन गायकवाड सहा. पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर, यांच्या हस्ते नवतरूण पिढीला साक्ष ठेवत वृक्ष रोपण करण्यात आले. तसेच याप्रसंगी सौ.अनिशा पाटील पोलीस पाटील कांद्रेभुरे, सुनंदा एक माणुसकीची भिंतीचे अधिकारी, पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमात श्री भीमसेन गायकवाड सहा, पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या तर्फे लहान मुलांना शैक्षणिक वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. श्री दिनेश ल गुडेकर अध्यक्ष, सुनंदा एक माणुसकीची भिंत, यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे, आणि गावकरी यांचे आभार मानले.तसेच अशा प्रकारचे कार्यक्रम या पुढेही होतील असे मनोगत व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here