उपमुख्यमंत्री पवार साहेबांनी पायी वारी साठी आग्रही असणाऱ्या वारकरी संघटनां व वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करावी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उपमुख्यमंत्री पवार साहेबांनी पायी वारी साठी आग्रही असणाऱ्या वारकरी संघटनां व वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करावी

विदर्भातील प्रशासकीय मीटिंगमध्ये नाना पटोले साहेब झाले होते भाऊक

सोलापूर // प्रतिनिधी

विदर्भाच्या इतिहासामध्ये प्रथमच वारकर्‍यांच्या भावना जाणून घेण्याकरिता मंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्या पुढाकारातून वारकरी संघटना प्रमुख व दिंडी चालकांची प्रशासकीय मिटिंग पार पडली आणि सोनाळा येथील दिंडीप्रमुख साबळे महाराज आपली भावना प्रकट करीत होते की जर आम्ही वारी मधी दिसलो नाही तर पंढरपुरातील आमचे वारकरी समजतात आपला वारकरी मरण पावला म्हणून आम्हाला वारीला जाऊ द्या साहेब
वारकरी अशा भावना प्रगट असताना माननीय नाना पटोले साहेब सुद्धा भाऊक झाले व त्यांचे अश्रू अनावर झाले होते

पायी वारी होऊ शकत नाही ही तळमळ फक्त वारकरी सांगू शकतो म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पायी वारी करता आग्रही असणाऱ्या वारकरी संघटनांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करावी

आषाढी वारी संदर्भात उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी निर्णय दिलेला आहे आणि काल पालखी सोहळ्याचे संस्थानिक यांनी सरकारने दिलेला निर्णय मान्य केलेला आहे व सरकारच्या निर्णयाचा आदर करून आम्ही वाहनाने पंढरपूरला जाण्या करिता तयार आहोत अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे

पण महाराष्ट्रातील सर्व वारकरी मंडळी मध्ये पायी वारी रद्द झाल्यामुळे फार मोठा नाराजीचा सूर निघत आहे कारण की पायी वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे. कोरोनाचे संकट हे महाराष्ट्रात आहे हे आम्ही जाणून आहोत पण जर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मनात घेतलं तर पायी वारी होणे अशक्य सुद्धा नाही

आतापर्यंत जेवढ्या काही बैठकी झाल्या त्या सरकार व पालखी सोहळ्याच्या मंदिर समिती सोबत झालेले आहेत संबंधित देवस्थान हे सरकारच्या अधीन असल्यामुळे देवस्थाना वरील विश्वस्त मंडळी सरकारच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि त्यांची भूमिका पायी वारीचे असल्यानंतर सुद्धा नाईलाजाने का होईना त्यांनी सरकारने घेतलेला निर्णय मान्य केलेला आहे

महाराष्ट्रातील वारकरी सुद्धा सरकारच्या विरोधात अजिबात नाहीत याउलट कोरोणा काळामध्ये वारकरी सांप्रदायने सरकारला फार मोठे सहकार्य केलेले च आहे पण आषाढी वारी पायी सोहळा करीता ज्या वारकरी संघटना आग्रही आहेत त्यांचे मत एकदा जाणून घ्यावे यांची विनंती आहे

महाराष्ट्रातील 95% वारकरी हे कुठल्या ना कुठल्या वारकरी संघटनांशी जुळलेले आहेत आणि म्हणून वारकरी संघटनांचा आवाज म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा आवाज आहे असे म्हणायला हरकत नाही

पाई वारी करिता आपल्या मनामध्ये जी भीती आहे की पालखी आपल्या गावांमध्ये आली तर गावातील भाविक दर्शनाकरता गर्दी करतील आणि पोलिसांना तिथे आपल्या बळाचा वापर करता येणार नाही.पण त्याकरिता उपाय असा आहे आपण सांगितल्या प्रमाणे पादुका ह्या वाहनाने येतील आणि किमान 50 वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतील पादुका जर आमच्या जवळ नसतील तर आम्ही गाथा ज्ञानेश्वरी सोबत घेऊन जाऊ आमच्या मनामध्ये भाव असा राहील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आमच्यासोबतच आहेत

आणि ह्या सर्व बाबी जाणून घेण्याकरता उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आमच्यासोबत फक्त एक तास व्हिडिओ कन्फरन्स द्वारे वारकरी प्रमुख संघटनांशी चर्चा करावी ही नम्र विनंती करण्यात येत आहे

आपण वारकऱ्यांच्या विनंतीस मान द्याल अशी आमची अपेक्षा आहे आपण जर वारकऱ्यांचा अपेक्षा बंद केला तर मग नाईलाजाने माझी वारी माझी जबाबदारी या नियमाने आम्ही स्वतःची नियमावली आखून नियमाचे पालन करून आळंदी ते पंढरपूर पायी जाणार आहोत व अमर्यादित संख्येत वारकरी पायी गेल्या पेक्षा आपण मर्यादित संख्या आखून दिलेले बरं राहील ही आपणास आमची विनंती आहे

पायी वारी व्हावी याकरिता विश्व वारकरी सेनेला आतापर्यंत ज्या वारकरी संघटनांचा पाठिंबा मिळालेला आहे त्यांची नावे समोर प्रमाणे ह-भ-प श्री सुधाकर महाराज इंगळे अखिल वारकरी भाविक मंडळ, योगेश महाराज सातारकर राष्ट्रीय भागवत धर्म परिषद, सदाशिव महाराज पवळे दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संघटना, पांडुरंग महाराज शितोळे वारकरी सेवा फाउंडेशन, निखिल महाराज सातपुते अखिल विश्व वारकरी परिषद, संतोष महाराज काळे वारकरी युवक संघ, दत्ता महाराज गांगरे हिंदू रक्षक धर्म परिषद

या सर्व वारकरी संघटनांचा माझी वारी माझी जबाबदारी या आंदोलना करिता गणेश महाराज शेटे यांच्या जवळ विश्व वारकरी सेनेला जाहीर पाठिंबा आलेला आहे आणि इतरही पायी वारी करीता आग्रही असणाऱ्या वारकरी संघटना पाठिंबा देणार आहेतच.

पायी वारी करीता आग्रही असणाऱ्या संघटनांच्या प्रमुख महाराज मंडळी व वारकरी प्रतिनिधींसोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून मार्ग काढावा ही नम्र विनंती करण्यात येत आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here