इथून पुढे प्रशासनाला व सरकारला कोणतीही माहिती न देता मोर्चा काढणार:- नरेंद्र पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

इथून पुढे प्रशासनाला व सरकारला कोणतीही माहिती न देता मोर्चा काढणार:- नरेंद्र पाटील

सोलापूर // प्रतिनिधी

मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा निघाला.  नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या मोर्चाच्या निमित्तानं शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात आली होती तर मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली होती.  मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. त्यानुसार आजचा मोर्चा निघाला.  

या मोर्चाला नरेंद्र पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते,आमदार राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, महापौर श्रीकांचना यन्नम, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक   माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. 
 
पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता

काढला जाईल- नरेंद्र पाटील 
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, आजच्या मोर्चात सहभागी झालेल्या एकही तरुणावर गुन्हा दाखल करू नका.  गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा. ब्रिटिश काळात जसे पोलीस वागायचे तसे आता पोलिसांनी तसेच केले. आजचा मोर्चा यशस्वी झाला, अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिला.  आम्ही कुणालाही टार्गेट करत नाही, आम्ही कुणाला टोला लगावला नाही.  उदयनराजे, संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे यांना निमंत्रण दिलं होतं. काही कामानिमित्त आले नसतील, पण त्यांच्या शुभेच्छा आमच्या सोबत आहेत.  यापुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढला जाईल, असंही ते म्हणाले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here