“आजोबांचा सल्ला डावलून नातू दौऱ्यावर” सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

“आजोबांचा सल्ला डावलून नातू दौऱ्यावर” सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा

राज्याला सध्या पुराचा मोठा फटका बसला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पुराने हाहाकार माजला आहे. शासनाकडून या भागांची पाहणी तर सुरु आहेच, मात्र अनेक राजकीय नेतेही पूरग्रस्त भागांना भेटी देत आहेत. मात्र, नेत्यांच्या दौऱ्यांमुळे सगळी यंत्रणा नेत्यांच्याच मागे लागते, त्यामुळे नेत्यांनी पूरग्रस्त भागात दौरे करू नयेत, असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं. मात्र, त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या चिपळूण दौऱ्यावरुन सदाभाऊ खोतांनी पवारांवर टीका केली आहे.

पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावरुन सदाभाऊ खोत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,  राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही. कर्जत-जामखेडचे आमदार चिपळूणच्या दौऱ्यावर ! आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here