सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध सोमवार पासून आणखी होणार शिथिल!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध सोमवार पासून आणखी होणार शिथिल!

लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता येत आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटविण्यात येत आहेत. राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त होत आहेत. 

पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता ही संख्या 21 झाली आहे. निर्बंध किती ठेवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ मध्ये जनजीवन सुरळीत सुरू होईल.

मुंबई जिल्ह्यात रुग्ण घटूनही महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. ठाणे, पुणे मात्र निर्बंधमुक्त होत आहे. कोरोनाबाधितांचे आठवड्याचे प्रमाण लक्षात घेत आणि खाटांची उपलब्धता या आधारे ठाणे आणि पुण्यासह 21 जिल्ह्यांमधील निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मात्र, मुंबईत गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई महापालिकेने जोखीम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाबाधितांचे आठवड्याचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजनसह रुग्ण असतील अशा जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात येणार आहेत.यात अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here