संपूर्ण आषाढ महिन्या मध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्माणी चे शेगावच्या धर्तीवर दर्शन व्यवस्था ठेवली तर दीड लाख लोक दर्शन घेतील:-ह भ प गणेश महाराज शेटे.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

संपूर्ण आषाढ महिन्या मध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्माणी चे शेगावच्या धर्तीवर दर्शन व्यवस्था ठेवली तर दीड लाख लोक दर्शन घेतील:-ह भ प गणेश महाराज शेटे.

सोलापूर // प्रतिनिधी

कोरोणा मुळे महाराष्ट्रातील सर्वच देवस्थान बंद आहेत भाविकांना ओढ लागली आहे ती पंढरपूर येथील पांडूरंगाच्या दर्शनाची आषाढी वारी मध्ये भाविकांची गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तर कोरोणाचा प्रादुर्भाव वाढेल असे कारण सांगून सरकारने मंदिर बंद ठेवले आहे
पण पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व सरकारने मनात आणले तर पूर्ण महिन्यात कमीत कमी दीड लाख भाविक दर्शन घेऊ शकतील
शेगाव येथील गजानन महाराज संस्थान मध्ये एका दिवसात तीन हजार भाविकांना कोरोना चे सर्व नियम पाळून दर्शन दिल्या जात होते आणि ही प्रक्रिया सर्व ऑनलाईन असल्यामुळे ज्या भाविकांचा दर्शनाचा नंबर आहे तो भावीक त्या तारखेला ठरावीक वेळेवर तिथे उपस्थित राहत होता
जर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीने ठरविले आपल्याला शेगाव पॅटर्न राबवून भाविकांना दर्शन द्यायचे आहे आणि सरकारने जर पुढाकार घेऊन होकार दिला तर एका दिवसाला तीन हजार भाविक म्हणजे तीस दिवसांमध्ये दीड लाख भाविक कुठल्याही प्रकारचा गळबळ गोंधळ न होता कोरोणा चे सर्व नियम पाळून दर्शन घेऊ शकतात
आणि या नियोजनाने पंढरपूर मध्ये गर्दी होणार नाही दररोज तीन हजार भाविक जर पंढरपूर मध्ये दर्शनाला आले तर जे छोटे-मोठे व्यवसायिक आहेत त्यांनाही उपजीविकेचे साधन प्राप्त होईल कारण की पंढरपूर येथील व्यवसायिक मंडळींचा उदरनिर्वाह हा यात्रेकरू मंडळींच्या भरवशावर आह व्यवसायिक मंडळींनाही वाटतं पंढरपूर मध्ये वारकरी आले पाहिजे

गेल्या दोन वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे देवस्थानला फार मोठी आर्थिक झड पोहोचलेली आहे जर भाविक दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला येत राहिले तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला आर्थिक स्वरूपात फार मोठी मदत होऊ शकते
कोरोना कालखंडामध्ये विठ्ठल रुक्मिणी समितीने कोरोनाशी निघडीत सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे त्यामध्ये कोरनटाईन सेंटर, ऑक्सीजन सिलेंडर, माक्स, सॅनिटायझर किंवा आर्थिक स्वरूपात सर्वतोपरी मदत केली आहे
जे भाविक पंढरपूर मध्ये येतील त्यांच्याजवळ कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय त्यांना प्रवेश टाळावा,
पण विचार सरकारच्या मनात येत की नाही ते पांडुरंगालाच माहित असे मत विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्री गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here