शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार :- आमदार प्रणिती शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार :- आमदार प्रणिती शिंदे

शहर उत्तर मधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार युवक काँग्रेसचा निर्धार

 

सोलापूर शहर युवक काँग्रेस प्रभाग क्रमांक 1 मध्ये शेळगी, हिप्परगा, नाथ रेसीडेन्सी रूपा भवानी जवळ असे तीन ठिकाणी शाखा व नामफलकाचे उद्दघाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात रुग्णसेवा केलेल्या कोव्हीड योध्याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक युवा नेते नूतन उत्तर विधानसभा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष आशुतोष वाले, उपाध्यक्ष अभिषेक गायकवाड़ हे होते.
यावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, युवा नेते राहुल वर्धा, तिरुपती परकीपंडला, राहुल गोयल, जगदीश व्हॅडराव, राजेंद्र कांबळे, शरद गुमटे, अभिषेक गायकवाड, धम्मा जगजाप, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी नूतन सोलापूर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष म्हणुन आशुतोष वाले, वार्ड अध्यक्ष शिव कोरे, सुनील जाधव, मेघराज बमनहळी, योगेश सोलापुरे, भगवान बिराजदार, मल्लिनाथ कुंभार, सोमा होनराव, बाळासाहेब कांबळे, यांची निवड करुण त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करुण शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, शहर उत्तर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नूतन कार्याध्यक्ष आशुतोष वाले यांचा मोट्ठी ताकद आहे युवा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. जनसंपर्क मोट्ठा आहे. अतिशय उस्ताह आज या ठिकाणी दिसत आहे. ही ताकद पक्षवाढी साठी करावा. त्यांचे वडील कुमार वाले हेही युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यानीही युवक काँग्रेस गाजविली लोकांची सेवा केली. काँग्रेस पक्ष हा तळागाळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. सध्या समाजाची दिशाभूल करणारे, जातिपातीत विभागनी करुण भाजपा राजकारण करत आहे. अश्या परिस्थितीत काँग्रेसची विचारसरणी देशासाठी महत्वाचे आहे. सर्वसमान्यांचा, महिलांचा, दलित मागास्वर्गीयांना ताकद देणारा पक्ष आहे. कोव्हीड काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरच्या जनतेची खुप सेवा केली. कोव्हीड संकटकाळात मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे, बेजबाबदरपणामुळे, ऑक्सीजन तुटवडा, औषध तुटवडयामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले या सर्वाला जबाबदार केंद्रातील मोदी सरकार आहे. मोदी हे निवडणुकीअगोधर लोकांना खोटे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत पण निवडून सत्तेवर आल्यानंतर जनतेचे हाल करत आहेर, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिड़ले आहेत. त्यांच्या मुले आमच्या माताभगिनिन्ना पुन्हा चुलिकडे वळून, गोवऱ्या वापरून स्वयपाक करावा लागत आहे म्हणून आम्ही मोदी सरकारला गोवऱ्या भेट दिल्या आहेत.

पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापुर महापालिकेत गेल्या चार वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. उजनी प्लस मध्ये असूनही सोलापुरच्या जनतेला पाच ते सहा दिवसाआड अपुरा पाणी पुरवठा होत आहे. रसत्यांची वाट लावली रस्ता आहे की खड्डे आहेत हेच समजेनासे झाले आहे. स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार चालू असून शहरातील सर्व प्रमुख रस्ते खोदुन ठेवले आहेत त्यामुळे सर्वत्र चिखलाचे, धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्द्भवत आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेवरुण घालविण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार असून येणाऱ्या महापालिकेत जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी देणार आहे. शहर उत्तर मधुन जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी युवक कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले तसेच संयोजक आशुतोष वाले, अभिषेक गायकवाड़, व नूतन नियुक्त केलेल्या वार्ड अध्यक्ष पदाधिकारी यांचे अभिनंदन करुण शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास शंकर मुंजे, योगीनाथ नागशेट्टी, आप्पू यलशेट्टी, सुरज काळे, वैजीनाथ नागशेट्टी, ओंकार स्वामी, अभिषेक गायकवाड, अशोक राजमाने, नागनाथ हौशट्टी, शीतल बिराजदार, दिपक साळुंखे, नागेश स्वामी, आकाश देशमुख, गुरुनाथ लंगडे, आदित्य कोरशट्टी, अजित हवळगी, निशिकांत काशीद, राहुल गुरव,सोमनाथ स्वामी, सिद्धाराम कोरे, मल्लू कोळेकर, जगन्नाथ गोटे, राजकुमार बळी, यांच्यासह इतर पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here