वीज मंडळाच्या कार्यालयात बळीराजाचा ठिय्या..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वीज मंडळाच्या कार्यालयात बळीराजाचा ठिय्या..!

सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथे दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी वीज मिळण्यासाठी कोटेशन भरून दोन वर्षाचा काळ उलटून गेला तरी देखील वीज दिली जात नाही म्हणून शेतकरी समवेत बळीराजा शेतकरी संघटनेने वीज मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले तेव्हा आठ दिवसाच्या आत वीज कनेक्शन देण्याचे आश्वासन उपअभियंता हेमंत तापकिरे यांनी दिले…
खंडाळी येथील शेतकरी राजेंद्र मुळे सचिन मुळे सुब्राव मुळे दत्तात्रय मुळे तानाजी मुळे व काकासाहेब मुळे यांच्यासह पंधरा ते वीस शेतकऱ्या यांनी सन २०११ साली शेतामध्ये वीज मिळण्यासाठी अर्ज केला आणि वीज मंडळाच्या नियमानुसार कोटेशन भरले तसेच वारंवार विजेची मागणी करण्यात आली यावेळी काही ठिकाणी विजेचे पोल उभे करण्यात आले मात्र तारा ओढून कनेक्शन देण्यात आले नाही सर्विस कनेक्शन देखील देण्यात आले नाही मात्र या सर्वांना वीज मंडळ न चुकता वेळेवर मोठ्या प्रमाणात जादा दराने विजेचे बिल मात्र देत आहेत वीज न देताच विजेचे बिल या शेतकऱ्यांना भरावे लागत आहे आज ना उद्या वीज मिळेल त्यामुळे नाइलाजाने वीज बिल भरत आहेत.

बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर जिल्हाउपाध्यक्ष रमेश भोसले व रामदास खराडे मोहोळ तालुकाध्यक्ष विठ्ठल ढेकळे काकासाहेब मुळे,औधुबर सुतार आदींनी वीज मंडळाचे उपअभियंता हेमंत तापकिरे यांची भेट घेतली आणि जोपर्यंत वीज कनेक्शन जोडून दिले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे नितीन बागल व माऊली जवळेकर सांगितले तेव्हा आठ दिवसांच्या आतच वीज देण्याचे आश्वासन उपअभियंता यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here