लेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये यश संपादन केल्याबद्दल नूतन आमदार समाधान आवताडे यांचा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीने लेबर फेडरेशनमध्ये सभेसाठी आले असता  अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.

    यावेळी सत्कारास उत्तर देताना आ. समाधान आवताडे म्हणाले की, कोणत्याही देशाचा विकास हा खरतर तेथील कामगारांच्या हातात असतो, त्यामुळे जनसेवा करत असताना त्यांची साथ मिळणे आवश्यक असते. माझे वडीलही लेबर फेडरेशनचे काही काळ संचालक होते. त्यामुळे माझ्या व्यावसायिक व राजकीय जडणघडणीत लेबर फेडरेशनचा महत्वपूर्ण रोल असल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले.  

     त्याचबरोबर माझ्या विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये सुद्धा लेबर फेडरेशनचे खूप मोठे योगदान असल्यामुळे येणाऱ्या काळात लेबर फेडरेशनच्या कोणत्याही प्रश्नावर आवाज उठविणे तसेच जिल्ह्यातील खाण चालकांच्या न्याय व हक्कांसाठी सदैव मदत करणे ही माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे त्यासाठी मी पूर्ण ताकतीने आपले प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही आ. समाधान आवताडे यांनी आवर्जून सांगितले.

   राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एका कर्तृत्वान लोकप्रतिनिधीचा सन्मान करणे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देणे ही लेबर फेडरेशनचे आद्यकर्तव्य समजून आ. समाधान आवताडे यांचा आम्ही सर्वांनी सत्कार केला अशी भावना जिल्हा लेबर फेडरेशनच्या सर्व संचालकांनी  व्यक्त केली .
 
   यावेळी जिल्हा लेबर फेडरेशनच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज काझी यांचाही सत्कार करण्यात आला.

  यावेळी राज्य फेडरेशनचे संचालक मा. शंकर चौगुले, फेडरेशनचे चेअरमन मा. बाबासाहेब कारंडे, व्हाईस चेअरमन चंद्रकांत आवताडे, रत्नमाला माने, राजेंद्र सुपाते, बाळासाहेब बागल,  नितीन घाडगे, सखुबाई सोनवले, प्रताप घाडगे, शंकर मांजरे, रामचंद्र पवार, संजय साळुंखे, बापूसाहेब भंडारे,  सखुबाई सोनवले, शंकरराव लचके, बालाजी निंबाळकर, तानाजी जाधव, लक्ष्मण विटकर, विजय मंठालकर, राजू चौगुले, बापूराव (पप्पू) काकेकर, विजय माने यांच्यासह लेबर फेडरेशनचे कर्मचारी अधिकारी तसेच सोलापूर शहरातील खाण मालक-चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here