लसीकरणाचे नियोजन नसल्यानेच विडी कामगारांवर आली उपासमारीची वेळ:- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लसीकरणाचे नियोजन नसल्यानेच विडी कामगारांवर आली उपासमारीची वेळ:- विष्णु कारमपुरी (महाराज)

 

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूरातील विडी कारखाने चालु करतांना महिला विडी कामगारांवर लसीकरण करणे बंधन कारक केले . परंतु लसीकरणाचे नियोजन न केल्यामुळेच महिला विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे . असा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रशासनावर केली आहे .
कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च व एप्रिल असे दोन महिने लॉकडाउनचा निबंध लावण्यात आला . लॉकडाउन शिथिलता करताना विडी उत्पादनावर निबंध कायमचे ठेवले . विडी कारखाने चालु व्हावे म्हणून महाराष्ट्र कामगार सेना व इतर कामगार संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली . या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आधाराने स्थानिक प्रशासन विडी उद्योग चालु करण्याचा परवाना दिले . परंतु सर्व विडी कामगारांना लस घेणे बंधनकारक केले . आणि कारखानदार लस न घेतल्यांना काम न देण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे सुमारे ५० ते ६० हजार विडी कामगार असलेल्या या उद्योगात लस विना काम मिळेना असे झाले . अशा प्रकारे विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली . लस उपलब्ध करून द्यावे . यासाठी सोलापूर शहरातील आमदार , नगरसेवक व अनेक समाज सेवकांनी अथक प्रयत्न केले . तरीही काहीही उपयोग झाला नाही . प्रशासनाने लसीबाबत केलेल्या नियोजन कागदावरच राहिले कोविड सेंटरवर लस घेण्यासाठी महिला विडी कामगारांची मोठी गर्दी वाढत चालली . परंतु लस उपलब्ध नसल्यामुळे कोविड सेंटर वरील डॉक्टर व अरोग्य कर्मचारी बरोबर विडी कामगारांचे वाद होऊ लागले . दिनांक ११ जुलै रोजी अक्कलकोट रोड वरील आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने महिला विडी कामगार रस्त्यावर गर्दी उभे केला . अशा अनेक प्रकारचे त्रास विडी कामगारांना करावे लागत आहे . त्यात उपासमारीची भर अशी परिस्थिती निर्माण झाली .
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी लस बाबत होत असलेल्या गोंधळाची दखल घेऊन दिनांक १२ जुलै रोजी मा . जिल्हाधिकारी श्री . शंभरकर साहेब यांच्याशी फोन वरून संपर्क साधून लस उपलब्ध करण्याची मागणी केली . त्याच बरोबर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री . धनराज पांडे यांना ही फोन वरून संपर्क साधून एकतर लस उपलब्ध करा किंवा आरोग्य केंद्रावरील प्रमुखास सुचना फलक लावण्यास आदेश द्या . असे बोलणे झाले . त्याचबरोबर पूर्व विभागातील भावनाऋषी हॉस्पीटल कोविड केंद्र व अक्कलकोट रोड वरील कोविड केंद्राला भेट घेवून केंद्र प्रमुखांना लस उपलब्धता बाबत सुचना फलक लावण्याचे विनंती केली . अशा प्रकारे विडी कामगारांना लस देण्याबाबत चालेला सावळा गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न कारमपुरी ( महाराज ) यांनी केला .
सर्व महिला विडी कामगारांना आव्हान करण्यात येते की, लस उपलब्ध असल्या बाबत खात्री इ पाल्यावरच लस घेण्यासाठी केंद्रावर जाणे असे आवाहन करण्यात येत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here