राष्ट्रवादीच्या गटनेत्याचे मनपा आयुक्तांकडे निवेदन सादर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादीच्या गटनेत्याचे मनपा आयुक्तांकडे निवेदन सादर!

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापुरातल्या मोदी स्मशानभूमीत असलेल्या विद्युत दाहिनीच्या चिमणीचा परिसरातील नागरिकांना त्रास होतोय. चिमनीतून मोठ्या प्रमाणावर धूर निघतो. हा धूर आणि काजळी परिसरातील नागरिकांच्या घरात जात आहेत. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी पालिका आय़ुक्तांकडे केली आहे.

सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत सध्या विद्युत दाहिन्या कार्यरत आहेत. एक विद्युत दाहिनी ही 1980 साली बसविण्यात आली होती. तर दुसरी विद्युत दाहिनी ही मागील काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली आहे. 1980 साली सुरु करण्यात आलेल्या विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची ही अंत्यत कमी आहे.

त्यामुळे त्यातून बाहेर निघणारे धूर आणि काजळी उंच आकाशात न जाता परिसरातील नागरिकांच्या घरात जात आहे. अशी तक्रार राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी केली आहे.

यांसदर्भात एबीपी माझाने किसन जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली यावेळी ते म्हणाले की, “मोदी स्मशानभूमीत सध्या दोन चिमणी कार्यरत आहेत. जून्या चिमणीतून निघणारा धूर हा परिसरातील नागरिकांच्या घरात जात असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार तत्कालीन आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे केली होती. त्यावेळी नवीन विद्यूत दाहिनी सुरु करण्याची मान्यता देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी नवीन विद्युत दाहिनी सुरु करण्यात आली आहे. नवीन चिमणीची उंची जास्त असल्याने त्याचा काही त्रास नाहीये. मात्र कोरोनामुळे विद्यूत दाहिनीत अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या दोन्ही चिमण्या कार्यरत आहे. जुन्या चिमणीतून ऩिघणारी काजळी आणि धूर हे थेट नागरिकांच्या घरात जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे लोक वैतागले आहेत, नागरिकांचा रोष वाढण्याआधी पालिकेने यावर तात्काळ उपाय योजना करावी.” अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती नगरसेवक किसन जाधव यांनी केली. दरम्यान पालिका आय़ुक्त पी. शिवशंकर यांनी यासंदर्भात दखल घेतली असून संबंधितांना उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील किसन जाधव यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here