मोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी मंजूर आ. यशवंत तात्या माने यांची माहिती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी मंजूर

आ. यशवंत तात्या माने यांची माहिती

 

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार साहेब,जलसंपदा मंत्री मा ना जयंतजी पाटील साहेब यांच्या विशेष सहकार्यतुन व माजी आमदार मा राजनजी पाटील साहेब व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष मा बळीराम(काका)साठे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली मोहोळ मतदारसंघातील शेतीच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी व उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापुर उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी असे मिळून ८० कोटी चा निधी चालू बजेट मध्ये मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार मा यशवंत(तात्या)माने साहेब यांनी दिली आहे.

   

सदरच्या योजनेसाठी मागील सन २०२०- २०२१ च्या आर्थिक बजेट मध्ये मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा योजनेसाठी ४० कोटी तर शिरापुर उपसा योजनेसाठी ३० कोटी असा ७० कोटी चा निधी मंजूर असून चालू बजेट मध्ये ८० कोटी चा निधी मंजूर  करण्यात आला आहे. दोन्ही उपसा योजनेसाठी १५० कोटी चा निधी मंजूर झाला असून मोहोळ मतदारसंघातील मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती साठी वरदान ठरणारी योजना डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण करण्याचा मानस असल्याची ग्वाही देखील आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांनी यावेळी दिली आहे. 

  

सदराच्या योजनेसाठी निधी मंजूर केल्याबद्दल उप मुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार साहेब,जलसंपदा मंत्री मा ना जयंतजी पाटील साहेब यांचे आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांनी आभार मानले आहेत.

     

सदरच्या योजनेसाठी 80कोटी चा निधी मंजूर केल्याबद्दल शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here