मोहोळ भाजपच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

मोहोळ (तालुका प्रतिनिधी)स्व. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेल्या बलिदानाचे फळ खऱ्या अर्थाने आज काश्मिरवासियांना आणि देशाला बघायला मिळत आहे”असे प्रतिपादन राष्ट्रीय संघाचे माजी तालुका कार्यवाह राजाभाऊ देशमुख यांनी केले.
आज च्या भाजपचे म्हणजे पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाचे संस्थापक स्वर्गीय डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मोहोळ तालुका व शहर भाजपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे,तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, माजी शहराध्यक्ष अविनाश पांढरे, तालुका सरचिटणीस महेश सोवनी,महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष अंजली काटकर,मोहोळचे नगरसेवक तथा शहर प्रभारी सुशील क्षीरसागर,अल्प संख्यांक आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष मुजीब मुजावर, उपाध्यक्ष भारत(पैलवान)आवारे, कामगार आघाडीचे मच्छिंद्र गाडे पाटील,भाजयुमो मोर्चा सरचिटणीस सागर लेंगरे, पंकज चव्हाण, आदी मान्यवर यावेळी उपस्थित उपस्थित होते.

पुढे बोलताना राजाभाऊ देशमुख म्हणाले की; आज आपण श्रेयासाठी धडपडतो मात्र डॉ.मुखर्जी यांच्यासह लाखो लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि दोन वर्षापूर्वी 370 कलम रद्द झाले.त्यामुळे खऱ्या अर्थाने काश्मीर हा भारताचा भाग झाला.याला डॉ.मुखर्जी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी,बलराज मधोक अशा आणि हजारो ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले.यावेळी डॉ.मुखर्जी यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला आभार महेश सोवनी यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here