मुख्यमंत्री साहेब दिवंगत अभिनेते दिलीप कुमारांच्या घरी सांत्वन करायला जाता; पण दिवंगत तरे साहेबांच्या कुटूंबियांना भेटायला वेळ नाही! असे का? – गणेश अंकुशराव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मुख्यमंत्री साहेब दिवंगत अभिनेते दिलीप कुमारांच्या घरी सांत्वन करायला जाता; पण दिवंगत तरे साहेबांच्या कुटूंबियांना भेटायला वेळ नाही! असे का? – गणेश अंकुशराव

पंढरपूर // प्रतिनिधी

नुकतेच महानायक दिलीप कुमार यांचे दु:खद निधन झाले तेंव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दिलीपकुमार यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करायला वेळ काढून गेले. परंतु मुख्यमंत्री साहेबांच्या शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी आमदार, ूएकवीरा देवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष व महाराष्ट्र कोळी समाजाचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या दु़:खद निधनाला अनेक महिने उलटून गेली तरीही मुख्यमंत्री साहेब आपणास त्यांच्या कुटूंबियांची साधी भेट घेण्यासही वेळ नाही? साहेब असे का? असा खडा सवाल उपस्थित करत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आपली व समाजाची नाराजी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी ज्यांनी आपली संपुर्ण हयात घालवली, ज्यांच्यामुळे ठाणे, मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीचे समाजबांधव शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले त्या तरे साहेबांचं समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठीचं स्व्प्नं मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तरे साहेबांच्या हयातीत पुर्ण केले नाही. 1995 चा जी.आर. तरे साहेबांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आला व यामुळेच आदिवासी कोळी जमातीमधील नोकरदारांना न्याय मिळणेसाठीचा मार्ग मोकळा झाला होता. यावरुनच समाजबांधवांसाठीची तरे साहेबांची तळमळ दिसुन येत होती. परंतु त्यांचे समाजाच्या विकासासाठीच्या प्रयत्नांना शिवसेना सत्तेत आली तरी यशस्वी होऊ दिले नाही. त्यांना विधानसभेचे तिकीट सुध्दा नाकारले. एकुणच शिवसेनेने त्यांचा व समाजाचा फक्त आपल्या फायद्यासाठी वापर केला पण अखेरपर्यंत त्यांना राजाश्रय मिळु दिला नाही. निदान तरे साहेबांच्या निधनानंतर तरी ठाकरे सरकारने त्यांच्या कुटूंबियांची विचारपुस करत त्यांना सांत्वनपर आधार द्यायला हवा अशी मागणी आम्ही केली होती. मात्र मुख्यमंत्री साहेबांना दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांच्या घरी जायला वेळ आहे पण अद्यापही ते कोळी समाजाचे दिवंगत नेते तरे साहेबांच्या घरी गेलेले नाहीत. यावरुनच त्यांची आदिवासी कोळी समाजविरोधी भुमिका ठळकपणे दिसून येत आहे.

आज तरे साहेब हयात नसले तरी त्यांच्या कार्याच्या रुपाने ते आपल्या प्रत्येकाच्या मनामनात जिवंत आहेत. त्यांची अधुरी स्वप्नं साकारण्याचं काम आता आम्ही हातात घेतलेले आहे. शिवसेनेकडून व त्यांच्या नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता तरे साहेबांचा कोळी समाजाच्या विकासाचा वारसा जपत त्यांच्या कार्याची ज्योत अखंडीत तळपती ठेवू असा विश्‍वासही गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here