माळशिरस तालुक्यातील आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग भूसंपादनातील बाधित शेतकऱ्यांची “बाधित संघर्ष समिती” आज खुडुस माळशिरस येथे आज स्थापन होणार-अजित बोरकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

बाधित शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना लढा देणार
शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील शेतकरी शेतजमीनीचा मोबदला मिळाला नसताना लाॅकडाऊनचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे, मोबदला मिळाला नसताना प्रशासन व जे एम म्हात्रे कंपनी यांच्याकडून पोलीस बळाचा वापर व दमदाटी करून जमीन ताब्यात घेणे, रस्ता साठी ३ गुंठे जमीन संपादन झालेली असताना 5 गुंठे क्षेत्रावर कंपनीने रस्ता केला आहे सातबारा उतारा मध्ये सामाईक दोन ते तीन नावे असताना एकाच व्यक्तीला पैसे दिले आहेत अशा अनेक घटना घडल्या आहेत सदर प्रशासन व कंपनी ही शेतक-यांवर अन्याय करत आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आज वार गुरुवार सकाळी 11 वाजता स्थळ खुडूस येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची बाधित शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात येणार आहे त्यामुळे ज्या ज्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे अशा शेतकऱ्यांनी ठीक अकरा वाजता बहुसंख्येने श्रीकृष्ण डेअरी खुडूस येथे उपस्थित रहावे. शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना थांबवणार नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here