भरपावसात पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भरपावसात पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार

सोलापूर // प्रतिनिधी 

पत्रकार सुरक्षा समितीची बैठक सोलापूर येथे घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार होते या बैठकीत
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
यादीवर नसलेल्या वृतपत्र ना शासकीय जाहिराती
कोरोना मुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला पाच लाख रुपये शासकीय मदत
पत्रकारांसाठी विमा व घरकुल योजना
पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी
राज्यातील युट्युब व वेब पोर्टल ला शासकीय मान्यता व जाहिराती मिळणे
या सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन पत्रकारांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नावर आक्रमक आंदोलने कारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला
यशवंत पवार यांची सरकार वर बोचरी टीका
देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 74 वर्ष पूर्ण होत असून लोकशाही चा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी नसणे ही बाब खूपच वेदनादायी असून पत्रकार म्हणून नोंदणी नसल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध योजनेचा लाभ शेकडो पत्रकारांना मिळत नसल्याची खंत व्यक्त करून
मूठभर पत्रकारांना खूष करण्यासाठी शेकडो पत्रकारांना वाऱ्यावर सोडल्याचा गंभीर आरोप प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी सरकार वर केला आहे. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष तानाजी माने शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी ( बी एस ) सचिव अभिषेक चिलका अक्षय बबलाद हरी भिसे अ करीम कामले संतोष खलाटे विवेकानंद खेत्री श्रीनिवास पेद्दी श्रीनिवास गोरला सतीश गडकरी ऋषिकेश ढेरे नागनाथ गणपा रोहन उपासे संजय वाघमारे विष्णू सुरवसे इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here