पंढरपूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील रहिवासी असलेले कु. प्रशांत ननवरे यांनी भारत सरकारने आयोजित केलेल्या संख्याशास्त्राच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उत्तुंग यशामुळे पंढरपूर तालुक्याच्या शिरपेच यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असा प्रकारचे यश मिळवणारा पंढरपूर तालुक्यातील तो पहिलाच विद्यार्थी आहे. आज सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक व युवा नेते रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते त्यांचा पंढरपूर येथील परिचारक यांच्या निवासस्थानी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न झाला

यावेळी इसबावीचे मा. नगरसेवक गणेश भाऊ आधटराव, सुभाष मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गंगामामा विभुते, भास्कर कसगावडे, अनिल अभंगराव सर, विक्रम शिरसट, बादलसिंह ठाकूर, अनिल यलमार,बंटू अंपळकर, सौ.पल्लवी यलमार आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here