पंढरपुर तालुक्यातील रांझणी येथे जगदंब हाँटेलवर दोन लाखाची देशी दारू जप्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपुर तालुक्यातील रांझणी येथे जगदंब हाँटेलवर दोन लाखाची देशी दारू जप्त

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूरात तालुक्यात अवैद्य धंद्ये मोठ्या प्रमाणात चालू असल्याने त्याची दखल घेऊन वाळू चोरी,मटका, दारू विक्री असे अवैद्य धंद्ये करणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्याच्या सुचना सोलापूर जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार पंढरपूर तालुक्यात अवैद्या धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

रांझणी येथील जगदंब हाँटेलवर मंगळवारी रात्री धाड टाकून २ लाख २ हजार सहाशे रूपयाची ७० बाँक्स मधील ३३३० बाटल्या देशी दारू साठा जप्त केली.तसेच हाँटेल मालकासह आणखी एकास अटक केली आहे.पंढरपूर विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी ही मोठी कारवाई केली आहे.त्यामुळे त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here