द.ह. कवठेकर प्रशालेचा दहावीचा निकाल १००टक्के जाहीर;गुणवंत विद्यार्थयांचा सत्कार समारंभ!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

पंढरपूर शहरातील द. ह. कवठेकर प्रशाला एज्युकेशन सोसायटीच्या सन 20-21 यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.

प्रारंभी मुख्याध्यापक श्री.व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी प्रास्ताविक करीत त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना व पालकांचे कौतुक केले.यावर्षी द.ह.कवठेकर प्रशालेत 282 विद्यार्थी परीक्षेस बसले होते व ते 100 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील 196 विद्यार्थ्यांना 75 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असून 100 टक्के गुणप्राप्त 06 विद्यार्थी असल्याचे सांगितले.

यावर्षी कला, क्रीडा व तंत्र विभागाच्या अतिरिक्त गुणांचा फायदा गुणवंत विद्यार्थ्यांना झाला. यावेळी प्रशालेतील अनुक्रमे प्रथम, कु. ईश्वरी मुडेगावकर, कु.श्रुती बागल, कु.ज्योत्स्ना अवताडे,कु.वीणा कुलकर्णी, कु. इशिता सावळे, चि. समर्थ तनमोर 100 टक्के गुण प्रथम तर द्वितीय कु.संस्कृती देशमाने, कु.गायत्री रेपाळ, कु. सुनिधी सोनवले, चि. प्रतिक मोरे प्रत्येकी 99.80 टक्के गुण द्वितीय आणि कु.पूजा पवार, कु.रुही तेंडुलकर, कु.साक्षी व्यवहारे, चि.पुष्कर गव्हाणे प्रत्येकी 99.60 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाले.

या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी श्री. एस.आर.पटवर्धन सर व श्री.वा.गो.भाळवणकर सर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.एम.कुलकर्णी
यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक श्री.व्ही.वाय.पाटील सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात या कार्यक्रमास पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री एस. आर. पटवर्धन सर पदाधिकारी श्री. वा.गो.भाळवणकर सर, श्री. एस.पी.कुलकर्णी सर, श्री.संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक श्री.व्ही.वाय.पाटील सर, पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here