दिनकर भाऊ मोरे यांच्या शुभहस्ते रोलर पूजनाचा झाला कार्यक्रम.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दिनकर भाऊ मोरे यांच्या शुभहस्ते रोलर पूजनाचा झाला कार्यक्रम.

(2021 व 22 साठीच्या गळीत हंगामासाठी चांगली तयारी:-डाॅ यशंवत कुलकर्णी)

 

सोलापूर // प्रतिनिधी

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2021 – 22 साठीच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे माजी चेअरमन मा. श्री दिनकरराव मोरे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामात जाहीर केलेले ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून येणारा गळीत हंगाम 2021 – 22 मध्ये 11 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे या संपूर्ण उसाची ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कारखान्याने उभारली असून. वाहतूक ठेकेदार व तोडणी ठेकेदार यांचे करार करण्याचे काम सध्या सुरू आहे तसेच ऑफ सीजन मध्ये कारखान्यांमध्ये करावे लागणा-या बदलाची कामे युद्धपातळीवर सुरु असून, वेळेत पूर्ण करून कारखाना गाळपास वेळेत तयार केला जाईल अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
कारखान्याचे चेअरमन आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की , कारखान्याच्या कार्यकारी संचालक, अधिकारी यांनी गत हंगामात उत्कृष्ट काम केले असून, त्याच प्रमाणे येणा-या हंगामातही अखंडित काम करून कारखान्याचे गाळपाची उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच कारखान्याची अंतर्गत असणारी सर्व कामे गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी वेळेत करून घ्यावीत कारखाना लवकर सुरू करण्यासाठी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

कारखान्याचे संचालक श्री दिलीप चव्हाण, श्री सुरेश आगवणे, श्री ज्ञानदेव ढोबळे, श्री तानाजी वाघमोडे,श्री बाळासाहेब शेख, श्री अरुण घोलप, श्री नागनाथ शिंदे, श्री शिवाजीराव साळुंखे, श्री चंद्रकांत फाटे, श्री ब्रह्मदेव पवार, श्री आनंद अरकीले, श्री नामदेव झांबरे, श्री गुलाब पोरे ईत्यादी संचालक तसेच कारखान्याचे अधिकारी श्री आर.बी.पाटील, श्री एम.आर.कुलकर्णी, श्री संतोष कुमठेकर, श्री रवींद्र काकडे, श्री सय्यदनुर शेख, श्री सोमनाथ भालेकर, श्री हनुमंत नागणे, श्री महेश देशपांडे, श्री तानाजी भोसले, युनियन पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

2021-22 सालासाठी कारखान्यासाठी मुबलक उसाची नोंद झाली असून गाळप हंगामाची पुर्व तयारी केली आहे. व या गाळप हंगामात आम्ही11लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून येणारा गाळप हंगाम चांगल्या पार पाडू असे कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक कुलकर्णी यांनी सांगीतले.

डॉ. यशवंत कुलकर्णी कार्यकारी संचालक पांडुरंग शुगर श्रीपुर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here