डॉक्टर डे निमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

डॉक्टर डे निमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान

 

डॉक्टर डे निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रोजी डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, IMA सोलापूर चे अध्यक्ष मिलिंद शहा, निमा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विनायक टेम्भुर्णीकर, निमा संघटना सोलापूर अध्यक्ष रुपेश एडके, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. माणिक गुर्रम, डॉ. विजय अंधारे, डॉ. सुहास पुजारी, डॉ. विशाल गोरे, डॉ. डॉ. अमोल आचलेकर, डॉ. सचिन जम्मा, विजयकुमार अरकाल, डॉ. अनुपम शहा, डॉ. सुमीत मोरे, डॉ. सचिन कोरे, डॉ. हरीश रायचुकर, डॉ. प्रशांत दौड, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. मन्मथ राऊत, डॉ. अमजद सय्यद, डॉ. युवराज माने, डॉ. अमोल पाटील, डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. अंजली शिवपूजे, डॉ. सोनाली घोंगडे, डॉ. अजीज जुनैदी, डॉ. रामचंद्र विन्नू, डॉ. आनंद मुदकण्णा, डॉ. सचिन बलदवा, डॉ. असिद चिडगुपकर, डॉ. शैलेशकुमार पाटील, डॉ. अग्रजा चिटणीस, शार्दूल कुलकर्णी, डॉ. दिनेश क्षीरसागर, डॉ. मनोज कोरे, डॉ. प्रीतम नरखेडकर, डॉ. मुक्तेश्वर शेटे, डॉ. नील रोहित पैके, डॉ. विराज प्रधान, डॉ. योगेश राठोड, डॉ. सुधांश कोठाडिया, डॉ. रिजवान उल हक, डॉ. सुनील शेवाळे, डॉ. प्रशांत गाडे, डॉ. निजाम कोतवाल, डॉ. निर्मलकुमार तापडिया, या डॉक्टरांचा सन्मानपत्र, शाल, पुस्तकसंच, व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. मिलिंद शहा, डॉ. विनायक टेम्भुर्णीकर, डॉ. माणिक गुर्रम, डॉ. विजय अंधारे, डॉ. विशाल गोरे, डॉ. आसिफ चिडगुपकर, डॉ. अंजली शिवपूजे आदी डॉक्टर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जो लढा दिला, कोरोना मुळे रुग्णांना नातेवाईकांना भेटायची सुद्धा परवानगी नसताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जो धैर्य दिला, जो उपचार केला त्यामुळे रुग्णांना अजून जगायची इच्छाशक्ती मिळत होती असे म्हणतात की उम्मीद पे दुनिया कायम म्हणूनच डॉक्टरांना पांढऱ्या कपड्यातील देवदूत म्हटले जाते. त्याचप्रमाणे कोरोना काळात काही रुग्ण व नातेवाईकांचा त्रास, रॅमिडिसीवर इंजेक्शन तुटवडा, ऑक्सिजन तुटवडा, औषध तुटवडा, बेड तुटवडा, आपल्या घरच्यांचा काय होईल अशी भीती अश्या सर्व संकटातून मार्ग काढून रुग्णांचा जीव वाचविलात आपल्या या कार्याला सलाम आणि थँकु डॉक्टर एवढेच म्हणू शकते. आम्हाला आपल्या कार्याची जाणीव आहे. आपल्या प्रति कृतज्ञता आहे म्हणूनच आज डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान करण्यात आले आहे. आणि आपण सर्वांनी मिळून समाजासाठी एकत्र येऊन काय करू शकतो याचे सूचना, मार्गदर्शन जरूर करावे असे विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक शहर अध्यक्ष प्रकाश वाले व आभार प्रदर्शन नगरसेवक विनोद भोसले यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here