ठाकरे सरकारने केलेले विकास कामाचे माहिती घराघरात पोहचवा :- पुरुषोत्तम बरडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ठाकरे सरकारने केलेले विकास कामाचे माहिती घराघरात पोहचवा :- पुरुषोत्तम बरडे

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी आघाडी सरकारच्या माध्यमातुन महाराष्ट्रात केलेल्या विकास कामाचे माहिती घराघरात पोहचवा असे आव्हान सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेना प्रभाग ९ मधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलातांना बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना केले .
शिवसंपर्क अभियाना अंतर्गत सोलापूर शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरातील सर्व प्रभागात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहे . त्या अंतर्गत दि . १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कामगार सेना कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले . बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे हे होते . तर शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावंकर , महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) , उपशहरप्रमुख धनराज जानकर , विभाग प्रमुख अनिल दंडगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होती .
प्रारंभी शिवछत्रपती शिवरायांच्या मुर्तीचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर अनिल दंडगुळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले . आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम बरडे यांनी बोलतांना म्हणाले की , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन कोरोना माहामारीच्या संकटातुनही विविध विकासाचे कामे केले . व कोरोना पळविण्याचा अत्यंत कठीण काम संयमाने पार पाडले आहे . त्याच बरोबर विविध काम करणाऱ्या गरीब कामगार , रिक्षा चालक आणि सर्वसामान्य लोकांना आर्थिक आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला . त्यामुळे देशातील १३ राज्यात केलेल्या सर्वेक्षणात नंबर १ चे मुख्यमंत्री बनले . म्हणुन आपण सर्वांनी त्यांनी केलेल्या विकास काम सर्वसामान्यांच्या घराघरात पोहचवा असे आवाहन केले . सदर प्रसंगी शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगांवकर , विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी आपले विचार मांडले .
शेवटी धनराज जानकर यांनी आभार मानून बैठक संपल्याचे जाहिर केले . त्यावेळी शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करण्यात आली . त्यावेळी बाळासाहेब ठाकरे जिदाबाद , उध्दव ठाकरे तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देण्यात आली .
महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी ९ नंबर प्रभागत मा . मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान अंतर्गत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे व शिवसैनिकांचे बैठकीचे आयोजन केले होते . सदर बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब , शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर , जिल्हा प्रसिध्दीप्रमुख निरंजन बोध्दुल , उपजिल्हाप्रमुख धनराज जानकर , विभागप्रमुख शिवा ढोकळे , विभाग प्रमुख अनिल दंडगुळे , उपशहर प्रमुख सोमनाथ शिंदे , वैद्यकीय कक्षाचे रविकांत गायकवाड , अॅड . मुनिनाथ कारमपुरी , विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख तुषार आवताडे , शाखाप्रमुख प्रशांत जक्का , दशरथ नंदाल , हर्षवर्धन शिरसे , यल्लप्पा मिठ्ठा , अंबादास कानकुर्ती , मल्लिकार्जुन सातलंगाव , गजानन केंगणाळकर , राज पांढरे आणि पदाधिकारीसह शिवसैनिक उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here