चोवीस तारखेपर्यंत पायी वारीचा फेरविचार न झाल्यास माझी वारी माझी जबाबदारी या नेमाने पायी वारी करणार आहोत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चोवीस तारखेपर्यंत पायी वारीचा फेरविचार न झाल्यास माझी वारी माझी जबाबदारी या नेमाने पायी वारी करणार आहोत

विश्व वारकरी सेनेचा सरकारला 24 जून पर्यंत अल्टिमेटम

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मंत्री यशोमती ताई ठाकूर व नाना पटोले साहेब यांच्या पुढाकारातून विदर्भातील दिंडी प्रमुख व वारकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक पार पडली या बैठक ला उप विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी शैलेश नवल, पोलीस आयुक्त हरी बालाजी एन, आमदार कुणाल पाटील, आमदार सुलभाताई खोडके यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि विदर्भातील प्रत्येक पालखी सोबत किमान दहा वारकऱ्यांना वाहनाने परवानगी देण्यात यावी ही मागणी करण्यात आली व विदर्भातील दिंडी चालकाने अमरावती किंवा नागपूर येथील कमिशनर ऑफीस येथे आपल्या दिंडीचा अर्ज दाखल करावा आपल्या मागणीकरिता आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन नाना पटोले साहेब व मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले

आषाढी वारी संदर्भात महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला तो वारकऱ्यांच्या भावनांचा विचार न करता निर्णय घेतलेला आहे म्हणून विश्व वारकरी सेनेच्या वतीने आम्ही या निर्णयाचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रातील मानाच्या पालखी सोहळ्यातील प्रत्येक दिंडी चालक, मालकाचा सर्व वारकरी संघटनांचा सरकारला आग्रह आहे या वर्षी कमीत कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायदळ वारी सोहळा व्हावा त्यामध्ये सरकार जे काही नियम अटी लावेल त्या सर्व वारकऱ्यांना मान्य राहतील
पण दहा मनाच्या पालकांना वाहनाने परवानगी देण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदाय मध्ये तीव्र नाराजीचा सूर निघत आहे पंढरपूर येथे अति अल्प स्वरूपात वारी जर झाली असती तर पंढरपूर मधील व्यवसायिक मंडळींना उदरनिर्वाहा करीता आर्थिक सहकार्य मिळाली असते पंढरपुरातील सत्तर टक्के जनता हे वारीच्या भरवशावर आपला उदरनिर्वाह करत आहे गेल्या दोन वर्षापासून यात्रा, मंदिर बंद आहे आणि म्हणून व्यवसायिक मंडळीच्या पुढेही उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामध्ये सरकारनेही कुठल्याच प्रकारचे अनुदान किंवा आर्थिक मदत त्यांना केलेली नाही
म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा फेरविचार करावा व किमान ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्याला तरी पन्नास वारकऱ्यांच्या उपस्थित पायदळ वारी करण्या करिता सर्व नियम व अटी लाऊन परवानगी द्यावी ही विनंती करण्यात येत आहे
जर येत्या 24 जून पर्यंत आमच्या मागणीचा फेरविचार केला नाही तर सरकार ज्याप्रमाणे आम्हाला माझे कुटुंब माझी जबाबदारी सांगते त्याप्रमाणे आम्ही सुद्धा सरकारला म्हणणार आहोत माझी वारी माझी जबाबदारी आणि या नियमाने आम्ही माऊलीच्या प्रस्थानाच्या दिवशी विश्व वारकरी सेनेच्या वतीने व इतरही काही वारकरी संघटना मिळून आमचीच जबाबदारी म्हणून कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन सर्व नियम व अटींचे पालन करून आळंदी येथून पंढरपूर करता पायी निघणार आहोत मग आमच्यासोबत पाच वारकरी असतील की 5000 हे सांगता येणार नाही म्हणून आता ही सरकारने वारकर्‍यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा ही विनंती
अमरावती येथील कलेक्टर ऑफिस मध्ये नाना पटोले साहेब व मंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्या पुढाकारातून विश्व वारकरी सेनेच्या मागणीला मान्यता देऊन विदर्भातील दिंडीप्रमुख महाराज मंडळींचे प्रशासकीय मिटिंग पार पडली व विदर्भातील किमान 40 दिंड्या आहेत त्यामध्ये प्रत्येक दिंडी सोबत किमान दहा वारकऱ्यांना वाहनाने परवानगी मिळावी ही मागणी करण्यात आली पण विदर्भातील सर्व वारकरी दिंडी ची नोंदणी आमच्याकडे नसल्यामुळे आपण अमरावती व नागपूर येथील कमिशनर ऑफिस मध्ये रीतसर आपल्या दिंडीची नोंदणी करावी व येत्या चार दिवसात आम्ही आपला प्रश्न मार्गी लागणार होता प्रयत्न करणार आहोत अश्या आशयाचे आश्वासन श्री नाना पटोले साहेब व मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे या प्रशासकीय अरुण म बुरघाटे म,शेटे म,निच्चीत,साबळे म,गावंडे म,महल्ले म, वाघमारे म, हरी ओम म, चौधरी म, इंगोले म, मुंदाने म ,हिरुळकर म,महल्ले म, रविंद्र म ,जायले म,पातोंड म,आमले म,अनिकेत म,ज्ञानेश्वर म,पुरष्षोत म, विक्रम म व बरीच दिंडी प्रमुख व वारकरी संघटनांची पदाधिकारी महाराज मंडळी उपस्थित होती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here